Homeताज्या बातम्यादेश

अरुणाचलमध्ये भाजपने गड राखला

सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाला पुन्हा बहुमत

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीसोबतच अरूणाचलप्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीचे निकाल रविवारी जाही

वाहन-गृह कर्ज पुन्हा महागले
देशातील रामसर स्थळांच्या संख्येत 5 नवीन स्थानाचा समावेश
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 10 दिवसांत काढण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीसोबतच अरूणाचलप्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर करण्यात आले असून, या मतमोजणीत अरूणाचलप्रदेशमध्ये भाजपने आपला गड कायम राखत 60 पैकी 46 जागा मिळवल्या असून, सिक्कीममध्ये देखील क्रांतीकारी मोर्चाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे.  क्रांतीकारी मोर्चाने 31 पैकी 31 जागा मिळवल्या असून, भाजपला मात्र याठिकाणी खातेही खोलता आलेले नाही. मात्र या दोन्ही राज्यात काँगे्रसला आपली कामगिरी अजूनही उंचावता आलेली नाही.
अरुणाचल आणि सिक्कीम विधानसभेसाठी 19 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. दोन्ही राज्यात काँग्रेसचे खातेही उघडलेले नाही. लोकसभा निवडणुकीत एसकेएमची एनडीएसोबत युती आहे, पण विधानसभा निवडणूक त्यांनी एकट्याने लढवली आहे.अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 10 जागा असून, याठिकाणी सत्ताधारी भाजपला आघाडी मिळाली आहे. कारण, येथे 10 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मु्ख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चौना में यांनी आधीच आपपल्या जागा जिंकल्या आहेत. अरूणाचल प्रदेशात यंदा भाजप 2019 पेक्षाही चांगली कामगिरी करताना दिसत आहे. 2019 मध्ये भाजपने 41 जागा जिंकल्या होत्या. आता हा आकडा 46 पर्यंत पोहचला आहे. कधीकाळी काँग्रेसमध्ये राहिलेले पेमा खांडू प्रथम 2016 मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2019 भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून शानदार विजय मिळवून दिला. आता तिसर्‍यांदा ते मुख्यमंत्री बनणार आहे. 21 ऑगस्ट 1979 मध्ये जन्मलेले पेमा खांडू यांचे कुटुंब राजकारणात होते. त्यांचे वडील दोरजी खांडू राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते मोनपा जनजातीतून येतात. दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर 2000 मध्ये काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले. प्रथम 30 जून 2011 रोजी ते बिनविरोध निवडून आले. त्यानंतर त्यांचा अरुणाचल प्रदेशातील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलसारख्या खेळांमध्ये पेमा खंडू यांना आवड होती. त्यामुळे राजकारणात आल्यानंतर त्यांनी खेळाला प्राधान्य देत अनेक योजना आणल्या.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तीन जागांवर विजय   – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिन उमेदवार हे अरूणाचल प्रदेशात आघाडीवर आहेत. त्यातील एका उमेदवाराने आपला विजय नोंदवला आहे. याचोली विधानसभा मतदार संघातून टोको तातुंग यांनी 228 मतांनी विजय नोंदवला आहे. तर लेकांग मतदार संघातून लिहा सोनी आणि बरोबर बोर्डुमसा-दियुं मतदार संघातून निख कामीं यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसने तीन जागांवर विजय मिळवला आहे

COMMENTS