Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार

भाजपच्या 6 माजी नगरसेवकांनी हाती बांधले शिवबंधन

छ. संभाजीनगर ः विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतांनाच राज्यात त्याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे. पक्षांतर करणार्‍यांची संख्या वाढत असून, रविवारी

प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा ; २०८८ सहायक प्राध्यापक पदे भरण्यास मान्यता
भेसळमुक्त, सकस आहाराला नागरिकांनी प्राधान्य द्यावे – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
दुधाचे दर न वाढविल्यास घालणार राडा

छ. संभाजीनगर ः विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतांनाच राज्यात त्याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे. पक्षांतर करणार्‍यांची संख्या वाढत असून, रविवारी भाजपच्या अनेक नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, जुमलेबाज सरकार घोषणा करत सुटले आहे. मात्र संभाजीनगरमध्ये आज मला जी ताकद मिळाली आहे, त्यामुळे संभाजीनगरचा गड आम्ही जिंकणारच असा निर्धार यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केला.
रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह 6 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे संभाजीनगरचा भाजपचा गड ढासळतांना दिसून येत आहे. त्यामुळे आमदार अतुल सावे यांच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या महाराष्ट्रात भाजप जाती जातींमध्ये भांडणे लावत आहे. सर्व समाजाला माझी विनंती आहे. तुमच्यासोबत मी उभा आहे. तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मात्र आपापसात भांडून न्याय मिळणार नाही. जे तुमच्यात आग लावत आहेत त्यांना निवडणुकीत पाळा. सर्वांनी एकत्र या राज्यकर्त्यांना एकजुटीची ताकद कळू दे. यावर तोडगा काढण्यासाठी राजकीय नेत्यांपेक्षा सरकारने विचारवंत लोकांशी एकत्र चर्चा करून तोडगा काढला पाहिजे. मग मी सरकारला पाठिंबा देईन. आरक्षणाची टक्केवारी वाढवा, विधानसभेत घोषणा करा. आमचा सरकारला पाठिंबा असेल, असे भाष्य उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केले आहे. कालच एका गद्दाराच्या क्लीनचिट दिली. पापे करा आणि क्लीनचिट मिळवा हे सरकारी धोरण आहे. राजकारणात घरे फोडणारी माणसे तुम्ही आहात. घरात तुम्ही वितुष्ट आणले आहे. बहिणींना योजना दिली. भावालाही योजना जाहीर करा. काही तरी जनतेच्या तोंडावर मागायचे आणि भीक द्यायची हा प्रकार महाराष्ट्रात आम्ही होऊ देणार नसल्याचा विश्‍वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS