Homeताज्या बातम्यादेश

भाजप नेते प्रभात झा यांचे निधन

भोपाळ ः भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रभात झा यांचे निधन झाले आहे. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात शुक्रवारी पहाटे

सिद्धेश कदम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवे अध्यक्ष
बेलापूरच्या उपसरपंचपदी मुश्ताक शेख
डॉ.पतकराव यांचेकडुन दिल्ली येथे राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

भोपाळ ः भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रभात झा यांचे निधन झाले आहे. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात शुक्रवारी पहाटे 5 वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. 67 वर्षीय झा दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्या मृत्यूची माहिती देताना त्यांचे सुपुत्र अयत्न यांनी सांगितले की, अंतिम संस्कार ग्वाल्हेर किंवा मूळ गाव कोरियाही, सीतामढी (बिहार) येथे केले जातील. प्रभात झा यांना सुमारे 26 दिवसांपूर्वी भोपाळमधील खासगी रुग्णालयातून गुरुग्रामला विमानाने नेण्यात आले होते.

COMMENTS