Homeताज्या बातम्यादेश

भाजप नेते पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी

नवी दिल्ली ः भाजप नेते आणि भोजपुरी गायक पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीत प्रसिध्द

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक; 7 पोलीस अधिकारी निलंबित
जिल्हा वार्षिक योजनेच्या 565 कोटी 88 लाखाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
विद्यार्थ्यांनी सत्यशोधक, लोकहितवादी झाले पाहिजे ः प्रा.डॉ.सुभाष वाघमारे

नवी दिल्ली ः भाजप नेते आणि भोजपुरी गायक पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीत प्रसिध्द भोजपुरी गायक पवन सिंह यांचे नाव होते. त्यांना पश्‍चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती. पण जाहीर झालेले तिकीट त्याचवेळी नाकारत आता ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पवन सिंह यांना एनडीएच्या उमेदवाराविरोधात केलेली बंडखोरी भोवली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

COMMENTS