Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनयभंग प्रकरणी अकोल्यातील भाजप नगरसेवकाला अटक

अकोले पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा

अकोले : भाजपचा नगरसेवक हितेश रामकृष्ण कुंभार याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून कुं

महात्मा बसवेश्वर, राजीव गांधी यांचे पुतळे हटवू नयेत
सशक्त नौदलाची संकल्पना शिवरायांची
माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’, 3 ते 4 महिन्यांत प्रमाणपत्र मिळणार

अकोले : भाजपचा नगरसेवक हितेश रामकृष्ण कुंभार याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून कुंभार याच्या विरूध्द अकोले पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कुंभार यास अटक केली आहे. न्यायालयाने त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कुंभार हा अकोले नगरपंचायतचा विद्यमान नगरसेवक आहे. पिडिता एका खाजगी शिकवणीला जाते. शिकवणी सुटल्यानंतर ती घरी जात असताना कुंभार तिच्या कडे एकटक पाहून बोलण्याचा प्रयत्न करायचा. घरी जात असताना तिचा पाठलाग करायचा. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी साडेसात वाजता पिडिता क्लास सुटल्यानंतर घरी जात होती. त्यावेळी कुंभार याने पिडितेचा हात पकडून जवळ ओढले. ‘तू मला आवडतेस असे म्हणून अंगावर हात फिरवून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक मनोज बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली खांडबहाले हे करत आहेत.

COMMENTS