Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हरियाणा विजयाचा पाथर्डीत भाजपकडून जल्लोष

पाथर्डी : हरियाणा तो झाँकी है महाराष्ट्र अब बाकी है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हौ आशा घोषणा देत हरियान

सोलापूर आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर जागतिक हेरिटेज दिन साजरा
धनी मला ही दाखवा ना विठूरायाची पंढरी !
वळवाच्या तडाख्याने फुटलेल्या द्राक्षांच्या घडावर मधमाशांचा हल्ला

पाथर्डी : हरियाणा तो झाँकी है महाराष्ट्र अब बाकी है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हौ आशा घोषणा देत हरियाना विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने मिळालेल्या घवघवीत यशाचा आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके फोडून एकमेकांना लाडू -पेढे वाटत जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
गेल्या महिन्यात पार पडलेल्या हरियाना राज्य विधानसभा निवडणुकीची आज सकाळी मतमोजणी सुरु झाली यामध्ये भाजपाने आघाडी घेत बहुमतापेक्षा जास्त जागा जिंकल्यानंतर आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुका भाजपाच्या वतीने शहरातील वसंतराव नाईक चौकात फटाके फोडून लाडू पेढे वाटत घोषणा देत जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अशोक चोरमले, भाजपा शहराध्यक्ष बंडू बोरुडे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,बजरंग घोडके, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, खरेदी विक्री संघाचे सभापती संदिप पठाडे, शेवगाव विधानसभा निवडणुक प्रमुख नारायण पालवे, सरचिटणीस जे.बी.वांढेकर, माजी अजय भंडारी, मुकुंद गर्जे, माजी नगरसेवक प्रवीण राजगुरु, रमेश हंडाळ, मंगलताई कोकाटे प्रा.रमेश काटे, वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. सुहास उरणकर, जगदीश काळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष वायकर, मुकुंद लोहिया, अशोक मंत्री, सचिन गायकवाड, तालुका उपाध्यक्ष नितीन गर्जे, माच्छिंद्र जायभाये आदि यावेळी उपस्थित होते.

COMMENTS