Homeताज्या बातम्या

अचलपूर नगरपरिषदेसाठी भाजप-एमआयएम एकत्र

अमरावती : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या राजकीय हालचालींना आता वेग आला असून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरप

घरकोंबड्या सरकारमुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार-
भाजपच्या विकास मॉडेलवर झेन-जी पिढीचा विश्‍वास ः पंतप्रधान मोदी
भाजप, केंद्र सरकारचा इडी, सीबीआय, एनसीबीच्या चौकश्या लाऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न (Video)

अमरावती : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या राजकीय हालचालींना आता वेग आला असून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत एक धक्कादायक सत्ता-समीकरण समोर आले आहे. निवडणूक काळात एकमेकांवर तीव्र टीका करणारे भाजप आणि एमआयएम हे पक्ष आता थेट सत्तेसाठी एकत्र आले असून, या युतीमुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.
अचलपूर नगरपरिषदेत भाजपने एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी दिली आहे. या सत्तास्थापन प्रक्रियेत एमआयएमचे तीन नगरसेवक, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक आणि तीन अपक्ष सदस्य भाजपच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेत भाजप-एमआयएमची अनौपचारिक युती प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र आहे. विचारधारात्मक विरोधक मानले जाणारे हे दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवर सत्तेसाठी जवळ येत असल्याने राजकीय विश्‍लेषकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणूक प्रचारात ध्रुवीकरणाचे राजकारण करणारे पक्ष सत्तेच्या गणितात मात्र वेगळी भूमिका घेत असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. भाजप आणि एमआयएममधील जवळीक प्रथम अकोट नगरपालिकेत उघडकीस आली होती. अकोट विकास मंचाच्या स्थापनेत एमआयएमच्या नगरसेवकांचा समावेश करण्यात आल्याने राज्यभरात राजकीय खळबळ उडाली होती. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करत एमआयएम व काँग्रेससोबत युती नकोच, असे ठाम मत मांडले होते. या प्रकरणी भाजपने आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला होता.

COMMENTS