Homeताज्या बातम्यादेश

गटाराच्या पाण्यात शिजवायचा बिर्याणी

व्हिडिओ व्हायरल होताच संतप्त नागरिकांनी चोपला

हरियाणा प्रतिनिधी - खवय्यांना नेहमीच काहितरी नवीन खायची इच्छा असते. चविष्ट पदार्थ खाण्याच्या नादात खवय्ये हॉटेल किंवा ढाब्यावर जात असतात. त्या

पर्यटन मंत्र्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करण्याची गरज : आ. शशिकांत शिंदे
‘अभिजात मराठी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी : सुभाष देसाई
देशाला मोदींशिवाय पर्याय नाही

हरियाणा प्रतिनिधी – खवय्यांना नेहमीच काहितरी नवीन खायची इच्छा असते. चविष्ट पदार्थ खाण्याच्या नादात खवय्ये हॉटेल किंवा ढाब्यावर जात असतात. त्यात बेत बिर्याणीचा असेल तर खवय्ये मन भरून खात असतात. मात्र तुम्हाला जर कळालं की, आपण जी बिर्याणी खातोय ती गटारातील पाण्याचा वापर करून बनवण्यात आली आहे तर नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होऊ लागला आहे, ज्यात काही लोक हॉटेलच्या मालकाला चोप देताना दिसून येत आहे. या व्हिडिओनूसार या हॉटेलचं नाव शमा बिर्यानी हॉटेल असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ कलका रोड,पिंजोर, हरियाणातील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की, या हॉटेलमध्ये जी बिर्याणी बनवली जाते ती, गटारातील पाण्याने बनवली जाते. कारण ज्या पाईपने पाणी भरलं जातं ते थेट गटारातून येत असल्याचे दिसून येत आहे. हे लोकांसमोर येताच संतप्त लोकांनी बिर्यानी हॉटेलच्या मालकाला चोप दिला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी देखील संतप्त प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत

COMMENTS