Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी फॅक्टरीवरून देवळाली प्रवराकडे दुचाकीवरून जात असलेल्या देवळाली प्रवरा येथील अशोक सुखदेव लोखंडे यांना अज्ञात वाहन

पहाटे पहाटे मला जाग आली…; काँग्रेस शहराध्यक्षांच्या गझलेला रसिकांची टाळ्यांची दाद
कर्मवीरांसोबत आदर्श शिक्षकांमुळे जीवन परिपूर्ण झाले ः  प्रा. विलासराव तुळे
शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी फॅक्टरीवरून देवळाली प्रवराकडे दुचाकीवरून जात असलेल्या देवळाली प्रवरा येथील अशोक सुखदेव लोखंडे यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार लोखंडे हे ओढ्यावरील पुलावरुन खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच मृत्यूमुखी पडले.

           याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी फॅक्टरी येथील मुसमाडे पेट्रोल पंपावर काम करत असलेले अशोक सुखदेव लोखंडे ही आपली ड्युटी संपल्यानंतर राहुरी  फॅक्टरी- श्रीरामपूर रोडवरून घरी जात असताना वडाच्या झाडाजवळील ओढ्याच्या पुलावर लोखंडे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या धडकेने लोखंडे दुचाकीसह पुलावरुन ओढ्यात जाऊन पडले. लोखंडे यांच्या डोक्याला जबर मार लागला हा अपघात झाल्याचे कोणाच्याही लक्षात न आल्याने बराच वेळ लोखंडे जखमी अवस्थेत ओढ्यात पडून होते.एका प्रवाशाच्या हा अपघात लक्षात आला.

त्याने स्थानिकांना या अपघाताची माहिती दिली.त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने  रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.माञ वैद्यकीय सुञांनी त्यास मृत घोषित केले.अपघातस्थळी वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके, रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे, पप्पू कांबळे यांनी तातडीने मदतकार्य करून लोखंडे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर लोणी येथे प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले. मयत लोखंडे यांच्या पश्‍चात आई वडील, दोन मुली, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. मयत लोखंडे हे मुसमाडे पेट्रोल पंपावर नोकरीला असल्याने त्यांचा अनेकांशी नेहमीचा संपर्क असल्याने त्यांच्या निधनाने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.

COMMENTS