Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे १ कोटींच्या खंडणीची मागणी

  मुंबई प्रतिनिधी - बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव नेहमीच चर्चेत असतो, पण सध्या एल्विश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही अज्ञात

ना. वडेट्टीवार यांच्याकडे अतिवृष्टीग्रस्त भागात दौरा करण्यास आग्रह धरणार: बाळासाहेब सानप
आरोपांमुळे राजीनामे द्यावे लागलेले मंत्री ; बॅ. अंतुले, निलंगेकर, अजित पवार, मलिक, सुतार, खडसे आदींचा समावेश
निकालानंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार

  मुंबई प्रतिनिधी – बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव नेहमीच चर्चेत असतो, पण सध्या एल्विश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत गुरुग्राम पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादव यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 नोव्हेंबर रोजी एल्विशला एक अनोळखी नंबरवरून फोन आला. हा फोन वजिराबाद गावाजवळून आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. एका अनोळखी फोनद्वारे एल्विश यादवकडून 1 कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. हा फोन नेमका कोणी केला? याबद्दल अद्याप कोणती माहिती मिळाली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी गुरुग्रामच्या पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एल्विश यादव हा एक सुप्रसिद्ध यूट्यूबर आहे. बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून त्यानं एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरात गेल्यापासूनच एल्विशची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एल्विशची प्रसिद्धी आणि फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच्या फॅन्समध्ये त्याच्या ‘सिस्टीम’च्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आता एल्विश यादवला गाण्यांपासून ते अनेक सिनेमाच्या ऑफर्स येत आहेत.

COMMENTS