Homeताज्या बातम्यादेश

आमिर खान चा मोठा निर्णय

आमिर खान पुढील दीड वर्ष अभिनयातून ब्रेक घेणार आहे. जवळपास 18 महिने तो रुपेरी पडद्यापासून लांब राहणार आहे. आमिरचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी

आमिर खानवर लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला गंभीर आरोप
आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटातील ‘तुर कलेयां’ गाणे रिलीज.
आमिर खान कडे लवकरच वाजणार सनई-चौघडे

आमिर खान पुढील दीड वर्ष अभिनयातून ब्रेक घेणार आहे. जवळपास 18 महिने तो रुपेरी पडद्यापासून लांब राहणार आहे. आमिरचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. मात्र असा निर्णय घेण्यामागचं कारणही त्याने स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घेण्यामागचं कारण काय ? कामातून काही काळ ब्रेक घेऊन कुटुंबीयांना तो वेळ देणार असल्याचं आमिरने सांगितलं. “जेव्हा मी अभिनेता म्हणून चित्रपटात काम करतो, तेव्हा त्या कामात मी पूर्णपणे व्यग्र होऊन जातो. माझ्या जीवनात दुसरं काहीच उरत नाही. याच कारणामुळे मी ब्रेक घेतोय. मला माझ्या कुटुंबीयांसोबत राहायचंय. माझी आई, माझ्या मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी फक्त कामच करतोय. मी फक्त माझ्या कामाकडेच पूर्ण लक्ष देतोय आणि जे लोक माझ्या जवळचे आहेत, त्यांच्यासाठी ही बाब योग्य नाही”, असं तो म्हणाला.

COMMENTS