Homeताज्या बातम्याक्रीडा

लखनऊला मोठा झटका, केएल राहुल चेन्नईविरुद्धच्या सामन्यातून बाहेर

लखनऊला सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या मांडीला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मै

क्रिकेटर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन
आशिया चषकापूर्वी रोहितचं तिरूपती बालाजीला साकडं
मुंबई इंडियन्सच्या संघात लसिथ मलिंगाचे पुनरागमन

लखनऊला सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या मांडीला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. तसेच आव्हानाचा पाठलाग करताना तो ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, दुखापतीमुळे त्याला धावणे शक्य झाले नाही. त्यामुळे बुधवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबत साशंकता आहे. राहुल या सामन्याला मुकल्यास कृणाल पंडय़ा लखनऊ संघाचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. लखनऊ आणि चेन्नई या दोनही संघांना गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचा विजयी पुनरागमनाचा प्रयत्न असेल. लखनऊच्या संघाची भिस्त काएल मेयर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोइनिस आणि कृणाल या खेळाडूंवर, तर चेन्नईची भिस्त ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांसारख्या खेळाडूंवर असेल. लखनऊ आणि चेन्नई या दोनही संघांनी आतापर्यंत नऊपैकी पाच सामने जिंकले असून त्यांचे १० गुण आहेत. मात्र, सरस निव्वळ धावगतीमुळे लखनऊचा (०.६३९) संघ गुणतालिकेत तिसऱ्या, तर चेन्नईचा (०.३२९) संघ चौथ्या स्थानावर आहे.

COMMENTS