Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीच्या भीमगित स्पर्धेला प्रतिसाद

बीड प्रतिनिधी - अवघ्या राज्याला बीडच्या जयभीम महोत्सवाने आदर्श घालून दिलेला आहे. या महोत्सवाच्या कालावधीत विविध कार्यक्रम साजरे होतात. त्या अनुषं

काँगे्रसला नवसंजीवनी मिळेल का ?
आमदार अपात्रतेच्या सुनावणीवेळी खडाजंगी
बोगस ‘टीईटी’ केलेल्या शिक्षकांच्या नोकर्‍या जाणार

बीड प्रतिनिधी – अवघ्या राज्याला बीडच्या जयभीम महोत्सवाने आदर्श घालून दिलेला आहे. या महोत्सवाच्या कालावधीत विविध कार्यक्रम साजरे होतात. त्या अनुषंगाने शनिवार (दि.8) रोजी  शहरातील आंबेडकर भवन येथे भीमगित गायन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेची सुरुवात अजय सवाई व त्यांचे पुत्र यश आणि पियुष यांनी गायिलेल्या सोनियाची उगवली सकाळ, दोनच राजे इथे गाजले या भीमगीताने झाली. या स्पर्धेतील लहान गटातील स्पर्धक दिव्यांश सुरवसे याने नांदणं नांदणं होतं रमाचं नांदणं भीमगीतं गायिले तर कैवल्या सुरवसे याने मेरा भीम जबरदस्त हैं भीमगीत गायिले. ’व्हावे भिमाचे चिंतन येथे… भिम आहे चिरंतन इथे…शाहू राजा भिमाचे करी मनापासून समर्थन इथे’, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामूळे अशी अनेक परिवर्तन क्रांतिकारी भीमगिते गावून स्पर्धकांनी नव्या क्रांतीच्या धगधगत्या मशाली पेटवून आंबेडकरी जनतेची मने जिंकली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त भीमगित गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन नायब तहसीलदार लताताई खंडागळे, अध्यक्ष म्हणून प्रा.वसंतराव ओगले, प्रमुख पाहुणे म्हणून एस.टी. गायकवाड, सुनिल बळवंते पस्थित होते.  या भीमगित गायन स्पर्धेला सर्व वयोगटातील स्पर्धकांनी मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये आंबेडकरी चळवळीला बळ देणारी भीमगिते स्पर्धकांनी सादर केली. स्पर्धेची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून झाली. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भीमगित गायन स्पर्धेला हजेरी लावली होती. लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंतच्या स्पर्धकांनी प्रत्येकाला स्फुर्ती देणारी अनेक क्रांतिकारी गीते सादर केली. या स्पर्धेला बौद्ध उपासक-उपासिका, आंबेडकरवादी  जनतेची लक्षणीय उपस्थिती होती.या स्पर्धेचे प्रस्ताविक अजय सवाई यांनी तर सुत्रसंचलन प्रा.पांडुरंग सुतार,आभार प्रा.अनिताताई शिंदे यांनी व्यक्त केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.दीपक जमदाडे, मीनाताई गायकवाड, विजेंद्र सरकटे यांनी केले.  ही स्पर्धा यशस्विरित्या पार पाडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तसेच भीमगित स्पर्धा गायन समितीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
यांनी पटकावला क्रमांक
लहान गटातून प्रथम राजविर वाघमारे, द्वितीय दिव्यांश सुरवसे, तृतीय यशवंत घोडेवार, प्रोत्साहनपर कैवल्य सुरवसे, साक्षी खोपे यांनी बाजी मारली तर मोठ्या गटातून प्रथम आकांक्षा अहिरे, द्वितीय विष्णू राठोड, तृतीय प्रिया आठवले, प्रोत्साहन साक्षी जाधव, सारंग जावळे यांनी क्रमांक पटकावले.

COMMENTS