Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भास्करराव पाटील खतगावकर यांची काँगे्रसमध्ये घरवापसी

भाजपला धक्का नांदेडमध्ये वाढणार काँगे्रसची ताकद

मुंबई ः राज्यात विधानसभा निवडणुुकीच्या आधीच राजकीय उलथापालथ होतांना दिसून येत आहे. भाजपला शुक्रवारी नांदेडमध्ये मोठा धक्का बसला असून तब्बल तीन वे

एसटीच्या संपाने प्रवाशांची लुटालूट
केज येथे सरस्वती महा विद्यालयात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न
न सांगता थेट प्रश्न करणे म्हणजे मिटकरींचा निव्वळ मुर्खपणा.

मुंबई ः राज्यात विधानसभा निवडणुुकीच्या आधीच राजकीय उलथापालथ होतांना दिसून येत आहे. भाजपला शुक्रवारी नांदेडमध्ये मोठा धक्का बसला असून तब्बल तीन वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार राहिलेल्या भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत या बड्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भास्कर पाटील खतगावकर यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व मीनल पाटील खतगावकर यांनीही काँग्रेसमध्ये घरवापसी केली. यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित देशमुख यांना मोठे यश आले आहे. त्यामुळे भास्करराव खतगावकर यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार तथा माजी महापौर ओमप्रकाश पोकर्णा यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचे आता ताकद वाढली आहे. कारण या बड्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेश केल्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की, माझ्याबरोबर प्रवेश करणारे माजी आमदार तथा माजी महापौर ओमप्रकाश पोकर्णा, आमचे नांदेड दक्षिणचे मोहनरावजी आंबर्डे, डॉ. मीनल खतगावकर आणि उपस्थित सर्व मान्यवर, मी आज परत माझ्या घरी आलेलो आहे. काँग्रेस पक्षाने मला तीन वेळा खासदार, तीन वेळा आमदार, राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली, असे भास्करराव खतगावकर म्हणाले. मी मधल्या काळात रागापोटी भाजपमध्ये गेलो. पण मला अतिशय आनंद आहे की, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मजबूत करण्याचे काम महाराष्ट्रात होत आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली परत काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे, तसेच येणार्‍या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजेत यासाठी मी, ओमप्रकाश पोकर्णा आणि आमचे सर्व सहकारी मित्र नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय. आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल नाना पटोले आपले आभार, अशी भूमिका भास्करराव खतगावकर यांनी पक्षप्रवेश करताना मांडली.

नायगाव विधानसभेची उमेदवारी हवी सूनेसाठी – भास्करराव पाटील खतगावकर यांना त्यांच्या स्नुषा मीनल यांच्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे. काँग्रेसने ही उमेदवारी देण्याची तयारी दर्शवल्यामुळे त्यांनी अशोक चव्हाण यांना धक्का देत काँग्रेसमध्ये येणे पसंत केले. भास्करराव पाटील हे 3 वेळा खासदार व 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांचा नांदेड काँग्रेसवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या त्यांच्या पक्षप्रवेशाचा काँग्रेसला मोठा लाभ होईल असा दावा केला जात आहे.

COMMENTS