Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भास्कर गँगकडून प्लॉटसाठी धमकी : पाच अटकेत

कोल्हापूर / प्रतिनिधी : जागेच्या कारणावरून एकास दमदाटी करून धमकी दिल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जवाहरनगरातील भास्कर गँग विरोधात गुन्हा द

महाबळेश्‍वर येथील पर्यटन विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अटक होणार? शिराळा न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट
सांगवड पुलाजवळ भीषण अपघात; 3 ठार, 2 गंभीर

कोल्हापूर / प्रतिनिधी : जागेच्या कारणावरून एकास दमदाटी करून धमकी दिल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जवाहरनगरातील भास्कर गँग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गँगमधील पाच जणांना अटक केल्याचे पोलीस निरीक्षक ईश्‍वर ओमासे यांनी सांगितले. अटक केलेल्यांमध्ये अमोल महादेव भास्कर, महादेव शामराव भास्कर, अमित ऊर्फ पिंटू महादेव भास्कर, शंकर शामराव भास्कर, संकेत सुदेश व्हटकर (सर्व रा. जवाहरनगर) यांचा समावेश असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : एका व्यक्तीने सन 1999 मध्ये जवाहर नगरातील एक जागा खरेदी केली. त्या जागेची बाजारभावाप्रमाणे किंमत 80 ते 90 लाख रुपये आहे. या जागेच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी कुंपण घातले. गेटला कुलूप लावले होते. ते प्लॉटची पाहणी करण्यासाठी आले असताना संशयित अमोल, महादेव, अमित, शंकर भास्कर आणि संकेत व्हटकर या पाचजणांनी त्यांना जागा नावावर कर म्हणून दमदाटी करून धमकावले, अशी फिर्याद संबंधित मालकाने दिली.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्‍वर ओमासे यांनी भास्कर गँगच्या संबधित पाच संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्या सर्वांना बुधवार, दि. 24 पर्यंत कोठडी सुनावली. दरम्यान, गँगविरोधात खंडणी, धमकी, बेकायदेशीर सावकारी अशा संदर्भातील तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन निरीक्षक ओमासे यांनी केले.

COMMENTS