जामखेड : सध्या अवैधरीत्या व्यवसाय करणारे उदड झाल्याचे दिसत आहेत. राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागीय कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जामखे
जामखेड : सध्या अवैधरीत्या व्यवसाय करणारे उदड झाल्याचे दिसत आहेत. राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागीय कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जामखेड तालुक्यात टाकलेल्या धाडीत ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जामखेड मधील प्रतिष्ठीत समजले जाणार्या व्यक्तींवर गून्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्हयातील जामखेड हददीत अवैध दारु वाहतुक व विक्रीच्या अनुषंगाने गस्त घालत असताना मिळालेल्या खात्रीलायक बातमीच्या अनुषंगाने जामखेड तालुक्यामधील अरणगाव श्रीगोंदा रोड वरील एच.पी. पोट्रोल पंपाजवळ पाळत ठेवली व सदर ठिकाणी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पीओ चारचाकी वाहन व मारुती सुझुकी कंपनीची स्विफट डिझायर वाहन येऊन महिंद्रा कंपनीची स्कॉर्पीओ चारचाकी वाहनामधील गोवा बनावटीच्या मद्य मारुती सुझुकी कंपनीची स्विफट डिझायर वाहनामध्ये भरत असताना छापा मारुन गोवा बनावटीच्या अँडीरियल व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या एकुण ३२४ सिलबंद बाटल्या (२७ बॉक्स) व वरील दोन वाहनासह अं. रु. १६,७२,७२०/- किंमतीचा मुददेमाल जप्त करुन
दिपक आत्माराम खेडकर (वय ४६) रा. रसाळनगर पोस्ट कार्यालयाशेजारी , भरत शहाजी राळेभात (वय ३५) वर्षे रा. राळेभातवस्ती, दोघे रा जामखेड जि. अहिल्यानगर. मनोज दत्तात्रय रायपल्ली (वय ४९) वर्षे रा. अतिथी कॉलनी बोरावके कॉलेज पाठीमागे, दत्तात्रय गंगाधर सोनवणे वय ३२ वर्षे रा. मुठेवडगाव तुळशीराम महाराज मंदिरासमोर दोघे रा श्रीरामपुर जि. अहिल्यानगर. शस्त्रगुण ऊर्फ शतृघ्न नवनाथ किर्दक (वय ३७) वर्षे रा. लोणारवाडी पो. शेळगाव ता. परांडा जि. धाराशिव, कैलास आण्णा जोगदंड वय ३४ वर्षे रा. लोणारवाडी पो. शेळगाव ता. परांडा जि. धाराशिव यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ अ, ई, ८१,८३,९० व १०८ अन्वये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्हयाच्या पुढील तपासामध्ये लोणारवाडी गावचे हददीत, भैरवनाथ मंदिराजवळ, ता. परांडा जि. धाराशिव या ठिकाणी छापा मारुन अशोक लेलॅण्ड कंपनीचा दोस्त चारचाकी वाहन क्र. एमएच ४५/ टी २२४७ व मारुती सुझुकी कंपनीची स्विफट डिझायर क्र. एमएच ०३ / एफ २७०५ सह अँडरीयल व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या २१६ सिलबंद बाटल्या १८ बॉक्स असा अंदाजे रु. १४,५०,४८०/- किंमतीचा मुददेमाल रिकव्हरी पंचनाम्याखाली जप्त करुन दोन इसमाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयामध्ये आतापर्यंत रु. ३१,२३,२००/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक नरेंद्र थोरात हे करीत आहेत.
COMMENTS