Homeताज्या बातम्यादेश

डिजिटल अटकेपासून सावध व्हा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी डिजिटल फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. डिजिटल अटकेसारखी फसवणूक टाळण्यासाठी प्रतीक्ष

गृह भेटीद्वारे वाई मतदार संघात वृध्दांसह दिव्यांग 139 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
Nokia G310 लॉन्च! कमी किमतीत दमदार फीचर
महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईस वेग

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी डिजिटल फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. डिजिटल अटकेसारखी फसवणूक टाळण्यासाठी प्रतीक्षा करा, विचार करा आणि कारवाई करा या तीन चरणांचा अवलंब करण्याबद्दलही त्यांनी सांगितले. ते म्हणाले तुम्हाला कॉल येताच थांबा, घाबरू नका, शांत राहा, घाईघाईने पाऊल उचलू नका, तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. स्क्रीन शॉट्स घ्या आणि रेकॉर्डिंग करा असे आवाहन ही त्यांनी केले. रविवारी मन की बातचा 115 वा भाग झाला. सरदार पटेल आणि बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी करण्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले डिजिटल फसवणूकीपासून सावध राहण्याची दुसरी पायरी म्हणजे विचार करा कोणतीही सरकारी एजन्सी फोनवर धमकावत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा पैसे मागत नाही. तसे असेल तर समजून घ्या की काहीतरी चूक आहे. यानंतर तिसरी पायरी ’टेक क्शन’ फॉलो करा. नॅशनल सायबर हेल्पलाइन 1930 डायल करा. गेल्या महिन्यात या उपक्रमाला 10 वर्षे पूर्ण झाली. याआधी शनिवारी पीएम मोदींच्या मन की बातवरील ‘मोदी संवाद’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

COMMENTS