मुंबई ः 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्य
मुंबई ः 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कलाकारांचा गौरव हा केला जाणार आहे. जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मल्याळी चित्रपट ’आट्टम’ने आपली छाप सोडली आहे. आट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याशिवाय मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ’वाळवी’ला देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रिषभ शेट्टी याला पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन हिला मिळाला असून चित्रपट कच्छ एक्सप्रेसला हा पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुरज बर्जाद्या मिळाला असून चित्रपट उंचाईसाठी हा पुरस्कार मिळालाय. त्याशिवाय, सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित ’वारसा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम कला-सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार, सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या मुंबईतील गिरण्यांवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ’कांतारा’साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडण्यात आले आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ’कांतारा’ची निवड करण्यात आली आहे. नित्या मेनन, मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ’कार्तिकेय’ 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ’पोनियिन सेल्वन 1’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तसेच, साहिल वैद्यच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ या माहितीपटाला 2 पुरस्कार जाहीर झाले आहेत. या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट आणि सर्वोत्कृष्ट कथन/व्हॉइस ओव्हरचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, सचिन सूर्यवंशी यांच्या ‘वारसा’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आर्ट कल्चरल चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, गुलमोहर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. तसेच, तर ज्येष्ठ पत्रकार आणि सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या मुंबईतील गिरण्यांवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
– सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ः वाळवी
– सर्वोत्कृष्ट मल्ल्याळी चित्रपट : आट्टम
– सर्वोत्कृष्ट संगीतकार : प्रीतम (ब्रह्मास्त्र)
– सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट : काबेरी अंतर्धान
– सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट : बागी दी धी
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : सूरज बडजात्या (ऊचांई)
– सर्वोत्कृष्ट अभिनेता : ऋषभ शेट्टी (कंतारा)
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मानसी पारेख (कच्छ एक्स्प्रेस) आणि नित्या मेनन (तिरुचित्रम्बलम)
COMMENTS