नेवासाफाटा/प्रतिनिधी ः आजच्या धकाधकीच्या जीवनात कधी कोणती परिस्थिती येईल हे सांगता येत नाही. आयुष्यात संकटे येतात आणि जातात, मात्र घरातील कुटूंब
नेवासाफाटा/प्रतिनिधी ः आजच्या धकाधकीच्या जीवनात कधी कोणती परिस्थिती येईल हे सांगता येत नाही. आयुष्यात संकटे येतात आणि जातात, मात्र घरातील कुटूंब प्रमुख निघून गेला तर त्याच्या कुटूंबाला आधार कोण देणार? हा प्रश्न नेहमीच सर्वांच्या मनात असतो. हिच वृत्ती जोपासत नागेबाबा मल्टीस्टेट व कालिका फर्निचर यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या ग्राहकांच्या कुटूंबाला एक आधार म्हणून नागेबाबा विमा संरक्षण कवच दिले. या विमा संरक्षण कवंच चा फायदा आज पर्यत शकडो ग्राहकांना झाला आहे असे प्रतिपादन कालिका फर्निचरचे मयूर रासने यांनी केले.
नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथील अमोल नवनाथ बर्डे, आलिंम सलीम पठाण ह्या ग्राहकांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता.त्या अपघातात त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांनी फर्निचर स्वरूपात घेतलेल्या कर्जाची राहिलेली रक्कम कालिका फर्निचर व नागेबाबा मल्टीस्टेट यांनी त्यांचा विमा मंजूर करत सोमवारी 20 मार्च रोजी या दोन्ही कुटूंबातील प्रमुख मयताच्या वरसांना घरी जाऊन या विमा योजनेचा लाभ सुपूर्द करत निल दाखला दिला. यावेळी नेवासा शाखेचे मॅनेजर गणेश वायकर, अशोक गोर्डे, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड, कालिका फर्निचरचे यश रासने, फायन्सस ऑफिसचे आतिष साबरे, व परिसरातील नागेबाबा मलिस्टेट खातेदार व कालिका फर्निचर ग्राहकांच्या उपस्थित हा लाभ सुपूर्द करण्यात आला.
प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचे काम – नेवासा फाटा येथील कालिका फर्निचर कडून घेतलेल्या वस्तूचे सर्व हप्ते विम्यातून फेडण्यात येणार असल्याने बर्डे व पठाण कुटूंबीयांना अशा संकटात देखील कालिका फर्निचर व नागेबाबा मल्टीस्टेट प्रत्येक कुटूंबाला आधार देण्याचे काम करत आहे हि बाब कौतुकास्पद आहे.
मायेचा आधार देणारी नागेबाबा मल्टीस्टेट – नागेबाबा म्हणजे मायेचा आधार. निधनानंतर पुढे काय असा प्रश्न सतावत होता हे विमा कवच आहे माहीत देखील नव्हते. अचानक नागेबाबाचे कर्मचारी तसेच कालिका फर्निचर यांनी फोन वरून माहिती दिली आणि आज एलईडी टीव्हीसाठी घेतलेल्या वस्तूचे सर्व कर्ज निल झाले. असे त्यांनी सांगितले मायेचा आधार देणारी नागेबाबा मल्टीस्टेट आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे कुटूंबातील प्रमुख वारसदार बोलताना म्हणाले.
COMMENTS