Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’तनपुरे’च्या संचालकांची चौकशीचे खंडपीठाचे आदेश

अवैध मुरूम उत्खनन आणि गाळप मंडळाला भोवले

देवळाली प्रवरा ः डॉ. तनपुरे साखर कारखान्यास बेकायदेशीर ऊस गाळपप्रकरणी साखर आयुक्तांनी 16 कोटी 30 लाख आणि बेकायदेशीर मुरूम उत्खननप्रकरणी महसूल प्र

मुळा डाव्या कालव्यातून तात्काळा आवर्तन सोडण्यात यावे ः तनपुरे
आर्थिक शिस्तीमुळेच प्रेरणा पतसंस्था प्रगतीपथावर
‘अग्निवीर’ उमेदवारांसाठी आमदार तनपुरेंकडून मोफत जेवण्याची व्यवस्था

देवळाली प्रवरा ः डॉ. तनपुरे साखर कारखान्यास बेकायदेशीर ऊस गाळपप्रकरणी साखर आयुक्तांनी 16 कोटी 30 लाख आणि बेकायदेशीर मुरूम उत्खननप्रकरणी महसूल प्रशासनाने 54 कोटी 81 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडात्मक प्रकरणांची सहकार कायद्यान्वये सोळा आठवड्यात चौकशी करून जबाबदारी निश्‍चितीची कारवाई करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने प्रादेशिक सहसंचालक साखर, अहमदनगर यांना दिले आहेत.
           न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे व न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने आदेश दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते अमृत अण्णासाहेब धुमाळ (रा. मुसळवाडी) यांचे वकील अँड. अजित काळे यांनी दिली. काळे म्हणाले की, ’डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याच्या संचालक मंडळाने 2021-22 हंगामात गाळप परवाना न घेता उसाचे गाळप केले. संचालक मंडळाच्या अशा बेकायदेशीर कृतीमुळे साखर आयुक्त (पुणे) यांनी कारखान्यास 96 कोटी 30 लाख 85 हजार दंड ठोठावला. कारखाना मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर मुरूम उत्खनन व वाहतूक झाली. अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी तहसीलदार (राहुरी) यांनी कारखान्यास 54 कोटी 81 लाख 59 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळ यांच्या गैरव्यवस्थापनामुळे साखर आयुक्त व तहसीलदार यांनी दंडात्मक कारवाईच्या नोटीसा बजावल्या. याचिकाकर्ते अमृत धुमाळ यांनी याचिकेत उपस्थित केलेल्या वरील मुद्दयांवर गैरकारभाराची कायद्यान्वये चौकशी करून जबाबदारी निश्‍चितीची कारवाई 16 आठवड्यात करावी, असे आदेश न्यायालयाने प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांना दिले आहेत. असेही अँड. काळे यांनी सांगितले.

वैयक्तिक मालमत्तेवर बोजा चढणार! – न्यायालयाच्या आदेशामुळे माजी खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखालील तनपुरे कारखान्याचे तत्कालीन चेअरमन नामदेव ढोकणे, व्हाईस चेअरमन दत्तात्रेय ढूस, प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे व संचालक मंडळाला चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. संचालक मंडळावर जबाबदारी निश्‍चितीची कारवाई झाल्यास, त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर बोजा चढणार असल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

COMMENTS