Belapur : चोरी करायला गेले… लग्नाचा अल्बम पाहून मागितले दागिने… बेलापूरात धुमाकूळ (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Belapur : चोरी करायला गेले… लग्नाचा अल्बम पाहून मागितले दागिने… बेलापूरात धुमाकूळ (Video)

गो शाळेजवळ असणाऱ्या दोन ठिकाणी चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला. या दरोड्यात रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागीने घेवुन चोरटे पसार झाले आहेत. बेलापुर श्रीराम

समृद्धी महामार्गाच्या गाडी ड्रायव्हरला मारहाण करून हत्या (Video)
महिला पोलिसांना मोठा दिलासा… राज्यात कामाच्या वेळेत कपात
भूत उतरविण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय पीडितेवर बलात्कार (Video)

गो शाळेजवळ असणाऱ्या दोन ठिकाणी चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला. या दरोड्यात रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागीने घेवुन चोरटे पसार झाले आहेत. बेलापुर श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गो शाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे.

रात्री दिड वाजे दरम्यान चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात असलेल्या लहान मुलीच्या गळ्याला चाकु लावला. त्यामुळे घरातील सर्व जण घाबरले त्यांनी शांत बसणे पसंत केले. जवळपास दिड तास चोरट्यांनी घरात उचका पाचक केली.

त्यांच्या घरातील लग्नाचा अलबमही चोरट्यांनी निवांतपणे पाहीला. त्यातील घरातील महीलांचे फोटो शोधुन फोटोत अंगावर घातलेले दागीने लवकर काढुन द्या असेही चोरट्यांनी दरडावले. खंडागळे यांच्या घरातुन जवळपास पंधरा ते वीस तोळे सोने व रोख रक्कमही चोरट्यांनी लांबविली.

त्यांनंतर भगीरथ चिंतामणी यांच्या दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यांच्या घरातुन ३५ हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबविले. भगीरथ यांचा मुलगा सोमनाथ याने एका चोरट्याशी झटापट केली त्यात चोरट्याने त्यांच्या पायावर लोखंडी राँडने मारहाण केली. सोमनाथनेही त्या चोरट्याला चांगलाच चोप दिला.

COMMENTS