Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 श्री विठ्ठलाच्या तुळशी पूजेला सुरुवात

पुजेचा मान मुक्ताईनगरला

पंढरपूर प्रतिनिधी - "तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचि ध्यान" असे वर्णन कायमच संतांनी विठ्ठलाचे केले आहे. विठ्ठलास प्राणप्रिय असणाऱ्य

कराड अर्बन बँकेची दीपावलीच्या तीनही दिवशी एटीएमद्वारे ग्राहक सेवा
११ महिलांचा दुर्दैवी मृत्यू | LOKNews24
बाबा रामदेव यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पंढरपूर प्रतिनिधी – “तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचि ध्यान” असे वर्णन कायमच संतांनी विठ्ठलाचे केले आहे. विठ्ठलास प्राणप्रिय असणाऱ्या तुळशी हाराची अर्थात तुळशीपूजा आजपासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सुरू झाली. तब्बल आठ वर्षानंतर मंदिरामध्ये तुळशीपूजा सुरू झाली आहे. आणि याच तुळशीपूजेचा पहिला मान संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर यांना मिळाला. तुळशी पूजा विठ्ठल मंदिरात विधिवत पद्धतीने करण्यात आली.  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवस्थान समितीने तुळशी पूजा पुन्हा एकदा सुरू केली आहे. यासाठी 2100 रुपये नाममात्र देणगी शुल्क आकारले जात आहे. सण महत्वाचे दिवस सोडुन प्रत्येक दिवशी तीस पूजा करण्यात येणार आहेत. यापैकी आज  24 भाविकांनी या पूजेचा लाभ घेतला आहे. आज पासून ही पूजा सर्व भाविकांसाठी खुली झाल्याने भाविका मधुन आनंद व्यक्त होत आहे. 

COMMENTS