Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्ह्याचा ‘साखर पॅटर्न’: गंगा माऊली शुगरने ओलांडला 5.50 लाख टनांचा टप्पा!जिल्ह्यात सर्वाधिक 11 टक्क्यांचा साखर उतारा; ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण

केज : बीड जिल्ह्याच्या साखर उद्योगात एक नवा आदर्श निर्माण करत गंगा माऊली शुगर कारखाना, उमरी (ता. केज) यांनी चालू गळीत हंगामात तब्बल 5 लाख 50 हजार

राष्ट्रसंत गाडगे महाराजांची सार्वजनिक 150 वी जयंती भव्यतेने साजरी करण्यासाठी बीडमध्ये महत्त्वपूर्ण बैठक
कपिलधार देवस्थान येथे 16 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला
अन्यथा महिला मुंडन करून सरकारचा निषेध करणार (Video)

केज : बीड जिल्ह्याच्या साखर उद्योगात एक नवा आदर्श निर्माण करत गंगा माऊली शुगर कारखाना, उमरी (ता. केज) यांनी चालू गळीत हंगामात तब्बल 5 लाख 50 हजार 88 मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, कारखान्याने जिल्ह्यातील सर्वोच्च 11 टक्के साखर उतारा मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. लक्ष्मणराव मोरे यांच्या नेतृत्वाखालील या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या विश्वासाला खर्‍या अर्थाने पात्र ठरवले आहे.
तीन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्याचे सुपुत्र लक्ष्मणराव मोरे यांनी शेतकर्‍यांच्या हक्काचा कारखाना या उद्देशाने गंगा माऊली शुगरची स्थापना केली. केवळ साखर उत्पादनावर आधारित असतानाही, उपपदार्थ निर्मिती करणार्‍या मोठ्या कारखान्यांच्या तोडीस तोड दर देऊन या कारखान्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरील हसू हाच आमचा खरा नफा हा विचार मोरे यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवला आहे. ‘गंगा माऊली’ची ठळक वैशिष्ट्ये विक्रमी गाळप: 5,50,088 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण, उच्चांकी उतारा: जिल्ह्यात सर्वाधिक 11% साखर उतारा, नियमित पेमेंट: दर 15 दिवसांनी बिल देण्याची परंपरा कायम, पारदर्शक कारभार: 28 फेब्रुवारीपर्यंतची सर्व बिले शेतकर्‍यांच्या खात्यात जमा कारखान्याच्या या यशामागे संपूर्ण व्यवस्थापन व कर्मचारी वर्गाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. लक्ष्मणराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य पाटील, राहुल भैय्या सोनवणे, हनुमंत काका मोरे, प्रविण मोरे, अविनाश मोरे तसेच सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांनी अहोरात्र परिश्रम घेतल्यामुळे हे उद्दिष्ट साध्य झाले आहे. आज 5.50 लाख टनांचा टप्पा गाठून कारखान्याने चालू हंगामातील गाळप बंद केले आहे. जिल्ह्यातील शेतकरी आणि कष्टकरी कामगारांच्या जीवावर हा कारखाना उभा आहे. आम्ही केवळ साखर उत्पादनातूनही शेतकर्‍यांना चांगला दर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही हे विश्वासाचे नाते असेच जपले जाईल. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कारखान्यातील कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्व स्तरांतून कारखान्याचे कौतुक होत आहे.

COMMENTS