Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त कर

मनसेने घातला महाविकास आघाडी सरकार पुतळ्यास दारूचा अभिषेक
कर्नाटक विधानसभेत बिदरला मोठे पद मिळणार
प्रेम प्रकरणातून जिवंत जाळलेल्या तरुणाचा मृत्यू | LOKNews24

मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. या हत्याकांड प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्यामुळे राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली. विष्णू चाटे हा केजचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता, मात्र या गुन्ह्यात त्याचे नाव आल्यानंतर त्याला तातडीने निलंबित केले होते. यानंतर आता संपूर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक लोकांची चौकशी सुद्धा झाली, त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली.

COMMENTS