Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाडी लावण्याच्या वादातून बीड जिल्हा न्यायालयात वकिलावर हल्ला

हात मोडला, रोकड व लॉकेट चोरीचा आरोपबीड । प्रतिनिधीबीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एका वकिलावर मारहाण करण्यात आल्

तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी
माता रमाई यांच्या जीवनातून संघर्ष व त्यागाची प्रेरणा घ्यावी-डॉ.प्रतिभा जाधव

हात मोडला, रोकड व लॉकेट चोरीचा आरोप
बीड । प्रतिनिधी
बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एका वकिलावर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत वकिलाचा हात मोडल्याचा दावा करण्यात आला असून गळ्यातील दोन तोळ्याचे लॉकेट व सुमारे दहा हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच पायांनी गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅड. राम पांडुरंग डोंगरे हे बीड जिल्हा न्यायालय परिसरात वकील व नोटरी म्हणून कार्यरत आहेत. दि. 24/02/2026 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता ते न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात आले होते. त्यावेळी त्यांच्या टेबललगत राधाकिसन रामचंद्र करपे (रा. शाहूनगर, बीड) यांनी मोटारसायकल उभी केली. मोटारसायकल बाजूला लावण्यास सांगितल्यावर मी इथेच गाडी लावणार, काय करायचे ते कर अशा शब्दांत प्रत्युत्तर देत करपे यांनी वाद घातल्याचा आरोप आहे. यानंतर अ‍ॅड. डोंगरे यांनी स्वतः मोटारसायकल बाजूला केली असता करपे यांनी त्यांना शिवीगाळ करत तुझ्यावर केस करतो, थांब तुला दाखवतो, अशी धमकी दिल्याचे सांगण्यात आले. सुमारे 10 ते 15 मिनिटांनंतर करपे हे 3 महिलां व 2 पुरुषांसह परत आले आणि अ‍ॅड. डोंगरे यांच्यावर अचानक हल्ला केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, संबंधितांनी अ‍ॅड. डोंगरे यांना मारहाण करत गळा दाबला. महिलांच्या नख्यांनी त्यांच्या गळ्यावर ओरखडे लागले. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तुझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देत आरोपी निघून गेले. तुला बीड शहरात फिरू देणार नाही, तुझी नोटरी व वकिली करू देणार नाही, अशा शब्दांत धमकावण्यात आल्याचेही नमूद आहे. या घटनेचा निषेध म्हणून बीड जिल्हा वकील संघ यांनी 25/02/2026 रोजी न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या सदस्यांनी या प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS