Beed : दिव्याखाली अंधार…आंदोलनासाठी बकेटभर पाणी विकत घ्यावे लागले (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : दिव्याखाली अंधार…आंदोलनासाठी बकेटभर पाणी विकत घ्यावे लागले (Video)

बीड जिल्हापरिषद कार्यालय मार्फत मुख्य कार्यकारी आधिकारी अजित पवार जिल्हाभर स्वच्छता अभियान 2 ऑक्टोबर रोजी राबवत असतात . मात्र  त्यांच्याच कार्यालयात

१००% नुकसान भरपाई व कर्जमाफी मिळावी निफाड युवक काँग्रेसची मागणी
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती
चाळीस हजारांची लाच घेतांना महिला सरपंचासह पतीस अटक

बीड जिल्हापरिषद कार्यालय मार्फत मुख्य कार्यकारी आधिकारी अजित पवार जिल्हाभर स्वच्छता अभियान 2 ऑक्टोबर रोजी राबवत असतात . मात्र  त्यांच्याच कार्यालयात शौचालयासाठी पाणी नसल्यामुळे’ दिव्याखाली अंधार” म्हणण्याची वेळ आली आहे. महिला कर्मचा-यांना शौचालयासाठी घरी जावे लागते, तर पिण्याच्या पाण्याची अडचण असल्याचे कर्मचा-यांने सांगितले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कागदोपत्रीच शौचालय बांधण्यात येऊन गैरव्यवहार करण्यात आला आहे.


ग्रामीण भागात ऊन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तिव्र पाणी टंचाई असते. अशा भागात केवळ कागदोपत्रीच शौचालय बांधण्यात आल्याचे दाखवुन आधिकारी व गावपुढा-यांनी शासनाची दिशाभूल करून लाखो रूपयांचा अपहार केला आहे. जिल्हापरिषद मधिल वरिष्ठ आधिका-यांचे हितसंबंध यात गुंतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांनी पुराव्यासह तक्रार, निवेदन, आंदोलन करून सुद्धा कारवाई करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ आज  जिल्हापरिषद कार्यालयातील शौचालय सफाई करून निषेध नोंदविण्यात आला आहे.

COMMENTS