Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजार समिती उपसभापतीपदी विनायक माळेकर  बिनविरोध

नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी विनायक माळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रोटेशनप्रमाणे सविता तुंगार यांनी उपसभापतिपद

चोरटा पकडण्याचा सिनेस्टाईल थरार ; अंगलट…तिघांविरुद्ध गुन्हा
विजपंप चोरीतील आरोपी निघाले मोटारसायकल चोर
शेतकऱ्यांनी ड्रॅगन फळाची शेती करावी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आवाहन

नाशिक – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी विनायक माळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रोटेशनप्रमाणे सविता तुंगार यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. मंगळवार(ता.१३) रोजी सकाळी ११ वाजता बाजार समिती कार्यालयात ही निवडप्रक्रिया पार पडली. बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित उपसभापतीपदी माळेकर यांनी दिली.   

    सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार (ता.१३) सकाळी साडे दहा वाजता सभापती देविदास पिंगळे यांच्यासह शिवाजी चुंभळे, उत्तमराव खांडबहाले,युवराज कोठुळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील,राजाराम धनवटे ,भास्करराव गावित,जगन्नाथ कटाळे,,कल्पना चुंभळे, निर्मला कड, सविता तुंगार, व्यापारी प्रतिनिधी संदीप पाटील, जगदीश आपसुंदे,हमाल मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम आदीसह संचालक बाजार समितीमध्ये दाखल झाले. सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक संदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. उपसभापतीपदासाठी विनायक माळेकर यांचा एकमेव अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच यावेळी बाजार समिती सचिव प्रकाश घोलप सहायक सचिव मनोज महाले,एन एल बागुल, मुख्य लिपिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी  उपस्थित होते.तसेच संचालक संपतराव सकाळे यांच्या सह इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन अभिनंदन केले . महाराष्ट्र अभियंता असोसिएशनचे पदाधिकारी व त्रंबकेश्र्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या महिन्यात झालेल्या व्ही.एन.नाईक संस्थेच्या निवडणुकीत बाजार समिती संचालक प्रल्हाद काकड निवडून आले. या निमित्ताने कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे व संचालकांनी पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

सभापती देविदास पिंगळे व सहकारी संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकत उपसभापतीपदी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आजवर शेतकरी हिताचीच कामे करीत आलो. यापुढेही ही कामे करीत राहील. संचालक मंडळाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. विनायक माळेकर, उपसभापती, नाकृउबा समिती

COMMENTS