Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बापूंनी सहकारातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला ः गणेश शिंदे

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते नागवडे कारखान्याचे संस्थापक माजी आमदार सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव (बापू) नागवडे यांनी श्रीगोंदा या दु

स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून उलगडणार सर्जिकल स्ट्राइकचा थरार| फिल्मी मसाला | LokNews24 |
शहीद जवान सातव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
औताडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पोहेगावात नागरी सत्कार

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते नागवडे कारखान्याचे संस्थापक माजी आमदार सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव (बापू) नागवडे यांनी श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला सहकार चळवळीच्या माध्यमातून ऊर्जित अवस्थेत आणून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे यांनी आयोजित पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांचे सहावे पुण्यस्मरण वांगदरी येथील ग्रामदैवत अंबिका माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी सहकार महर्षी बापूंच्या कार्य कर्तुत्वावर स्तुती सुमने वाहत बापू हे राज्यातील सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. सहकार महर्षी बापूंचे अखेरच्या श्‍वासापर्यंत 84 वय असताना तब्बल 65 वर्ष सर्वसामान्यांचे हित जोपासले. बापूंनी कष्टकरी शेतकर्‍यांच्या हितासाठी या दुष्काळी तालुक्याला मोठ्या संघर्षातून भरीव योगदान देत तालुका सुजलाम सुफलाम केला. त्यामुळे बापूंनी तालुक्याचा विकास साधताना तालुक्याला सहकारातून  समृद्धीच्या वाटेवर नेऊन ठेवले. सहकार, सिंचन, कृषी, शिक्षण या क्षेत्राला बळकटी देत आज हा तालुका सहकार महर्षी बापूंच्या संघर्षामुळेच सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही असे सांगत व्याख्याते शिंदे यांनी सहकार महर्षी बापूंचे कार्य हे दीपस्तंभ सारखे होते.

अशा या गुणवंत किर्तीवंत बापूंच्या स्मृतीला उजाळा देणे हे आपणा सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे.  जीवनाचा मंत्र सांगताना व्याख्याते शिंदे पुढे म्हणाले की; माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर आहे. मनुष्य जन्माला येताना नऊ महिने समजते. परंतु जाताना मात्र कळत नाही हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाने खूप सुंदर जीवन जगण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळे निसर्गासोबत जुळून घेतलं तर जीवन सुंदर होईल. निसर्गाने मात्र पात्रता दाखवून दिलेले आहे. त्याचे पालन करण्याची आवश्यकता आहे. आपणाकडे पैसे भरपूर येतील परंतु आरोग्य शिल्लक राहणार नाही याची खबरदारी ही सर्वांनी घ्यावी असे सांगत श्री शिंदे यांनी निसर्ग समाज आणि अर्थकारण याविषयी सहकार महर्षी बापूंच्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थिततांना भरीव असे मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी बापूंच्या कार्याला उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. या सोहळ्यास नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुल दादा जगताप, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे, विठ्ठलराव नागवडे, उत्तमराव नागवडे, शहाजी काका नागवडे,दीपकशेठ नागवडे, पृथ्वीराज नागवडे, घनश्याम शेलार, केशवराव मगर, प्रेमराज भोईटे, भुजंगराव नागवडे, डॉ. दत्तात्रय नागवडे, दीपक भोसले,रामचंद्र नागवडे, सरपंच संजय नागवडे, जिजाबापू शिंदे, गणपतराव काकडे, राम अण्णा नागवडे, आदेश नागवडे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे,ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड सर, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड सर आदींसह नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक, तालुक्यातील सोसायट्यांचे आजी माजी चेअरमन, व्हाईसचेअरमन संचालक, ग्रामपंचायतींचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब बांदल यांनी केले. ऋणनिर्देश व उपस्थित मान्यवरांचे आभार नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी मानले.

COMMENTS