ठाकरेंविरोधात पुण्यासह डोंबिवली मध्ये शिंदे गटाकडून बॅनरबाजी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरेंविरोधात पुण्यासह डोंबिवली मध्ये शिंदे गटाकडून बॅनरबाजी

‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील वाद संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. राजकीय क्षेत्रात ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकल्या

अमरावतीत दिव्यांग विद्यापीठ व्हावं , बच्चू कडूंची मागणी 
पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच
समान संहितेची प्रयोगभूमी : उत्तराखंड !

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील वाद संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. राजकीय क्षेत्रात ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान महाराष्ट्रात येणारे उद्योग प्रकल्प गुजरातला गेल्याने पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे. यातच पुण्यात शिंदे गटाकडून बॅनरवर उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ असे बॅनरवर लिहून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे. बाळासाहेबांची युवा सेना पुणे शहरच्यावतीने पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यासोबतच डोंबिवलीत देखील शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

COMMENTS