Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बँक कर्मचार्‍यांचा संप स्थगित

मुंबई/प्रतिनिधी ः केंद्र सरकार बँकाचे खासगीकरण करण्याच्या हालचाली करत असल्यामुळे बँक कर्मचार्‍यांनी 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचा इशारा दिला होत

पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या
भारतात शिक्षणापेक्षा लग्नावर सर्वाधिक खर्च
जुळया बहिणीं सोबत लग्न करणारा युवक अडकला कायद्याच्या बेडीत

मुंबई/प्रतिनिधी ः केंद्र सरकार बँकाचे खासगीकरण करण्याच्या हालचाली करत असल्यामुळे बँक कर्मचार्‍यांनी 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचा इशारा दिला होता. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस बँका बंद राहणार होत्या, मात्र हा संप स्थगित करण्यात आल्याची माहिती बँक संघटनांनी दिली आहे.
केंद्रीय स्तरावर फाइव्ह डे वीकसह अन्य विषयांवर चर्चा झाल्यानंतर संप रद्द करण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत संप स्थगित करण्यात आला. बँक एम्प्लॉईज युनियनचे अखिल भारतीय सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी ही माहिती दिली आहे. या दिवसात बँकांचे कामकाज सामान्य दिवसांप्रमाणे सुरू राहणार आहे. बँक युनियनचा हा संप 30 आणि 31 जानेवारीला होणार होता. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी निदर्शने देखील करण्यात आली होती. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे संयुक्त सचिव डीएन त्रिवेदी यांनी सांगितले की, सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर 30 आणि 31 तारखेला बँका बंद राहणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

COMMENTS