स्थळ बदलाच्या मागणीला आयसीसीकडून नकारनवी दिल्ली : भारतामध्ये होणार्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यास बांगलादेशने स्पष्ट नकार दिला

स्थळ बदलाच्या मागणीला आयसीसीकडून नकार
नवी दिल्ली : भारतामध्ये होणार्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यास बांगलादेशने स्पष्ट नकार दिला असून, त्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्थळ बदलण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मागणी फेटाळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
गुरुवारी राष्ट्रीय संघातील खेळाडूंशी झालेल्या बैठकीनंतर बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी सांगितले की, विश्वचषक खेळण्याची तयारी असली तरी भारतात खेळताना खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर शंका कायम आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भारतात खेळणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी आयसीसीशी संवाद सुरूच राहील, असे सांगितले. आयसीसीच्या अलीकडील बोर्ड बैठकीतील काही निर्णय अनपेक्षित असल्याचे नमूद करत, बांगलादेश आपली भूमिका मांडत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. एक दिवस आधी, 21 जानेवारी रोजी आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला भारतातच सामने खेळण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सामने श्रीलंकेत घेण्याची बीसीबीची मागणी आयसीसीने नाकारली.

COMMENTS