Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती विक्रीस मनाई; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने मुर्तीकारागिर हतबल

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांमधील जल आणि वायू प्रदुषणामध्ये वाढ होऊ नये याकरिता उपाययोजना करणे गरजेचे असल्याने प्ला

महाबळेश्‍वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ
गोंदवले येथील जुगार अड्ड्यावर छापा; 3 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त
देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; विकणार्‍यासह खरेदी करणारे सातारा जिल्ह्यातील तिघे अटकेत

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांमधील जल आणि वायू प्रदुषणामध्ये वाढ होऊ नये याकरिता उपाययोजना करणे गरजेचे असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरामुळे निसर्गामध्ये होणारे प्रदुषण आणि पर्यावरणामध्ये होणारे बदल व त्यापासून होणारा भविष्यातील धोका विचारात घेऊन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या सर्व प्रकारच्या मूर्ती वितरण व विक्रीवर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतुदीनुसार बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. दरम्यान, गेल्या चार वर्षापासून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास प्रशासनाला सवड मिळाली नव्हती. आता गौरी-गणपतीच्या मुर्ती तयार झाल्यानंतर प्रशासनाने हा आदेश दिल्याने मुर्ती कारागिर हतबल झाले आहेत.
सातारा जिल्ह्यात प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनविण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या मुर्ती उत्पादन, वितरण व खेरदी-विक्री करण्यावर दि. 6 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात येत आहे. ज्या मुर्तीकारांकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती असतील त्यांना दि. 5 जुलै 2022 पर्यंत त्याची विक्री करण्याची मुभा देण्यात येत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सर्व प्रकारच्या मुर्ती बनविणे, वितरण करणे, आयात करण्यावर दि. 6 जुलै 2022 पासून प्रतिबंध लावण्यात येणार आहेत. त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती आढळून आल्यास मूर्ती जप्त करुन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. मुर्ती तयार करणारे, विक्री करणारे तसेच खरेदी करणार्‍या व्यक्तीविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने तसेच आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याकरिता स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, पदाधिकारी (नगरपालिका व ग्रामपंचायत) पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत उप-प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ सातारा आणि पर्यावरण विषयक कामकाज करणार्‍या संस्थाचे प्रतिनिधी यांचे पथक तयार करण्यात आले असल्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.

COMMENTS