Homeताज्या बातम्यादेश

कॅनडातील लोकांना भारतात प्रवेश बंदी

भारताने व्हिसा सेवा केली बंद; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः खलिस्तानी अतिरेकी हरप्रीत सिंग निज्जर यांच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये उघडपणे संघर्ष सुरू झाला आहे. क

अनुष्का-विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार ?
चार गावच्या टाक्यांसह 72 नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता
समन्यायी पाणी वाटप बाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः खलिस्तानी अतिरेकी हरप्रीत सिंग निज्जर यांच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये उघडपणे संघर्ष सुरू झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी थेट भारत सरकारवर हरप्रीत सिंग निज्जरच्या हत्येचा आरोप केला आहे. त्यानंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी देखील कॅनडाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली असतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनेडाच्या व्हिसावर भारतात बंदी घालण्यात आल्यामुळे आता कोणत्याही कॅनडातील नागरिकांना भारतात प्रवेश करता येणार नाही.  पुढील सूचना येईपर्यंत व्हिसाबंदी लागू असणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. आता भारत सरकारने कॅनडातील भारताची व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली असून पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा स्थगित असेल, असं कॅनडातील व्हिसा केंद्राच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं आहे. भारतातून कॅनडामध्ये जाणार्‍या व कॅनडातून भारतात येणार्‍या असंख्य भारतीय व कॅनेडियन नागरिकांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे.  दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांना विशेष सूचना जारी केल्या. या पार्श्‍वभूमीवर भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून व्हिसा केंद्राच्या संकेतस्थळावर ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. दरम्यान, कॅनडाच्या आरोपांनंतर भारत सरकारने कॅनडातील भारतीयांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कॅनडामधील भारतविरोधोी कारवाया, राजकीय पुरस्कृत द्वेष-गुन्हे आणि हिंसाचार पाहाता तिथे राहणारे भारतीय नागरिक व तिथे जाऊ इच्छिणारे भारतीय यांनी अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे. कॅनडातील भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणार्‍या भारतीयांना व भारतीय अधिकार्‍यांना धोका पोहोचवण्याचे प्रयत्न झाले. या सर्व घटनांमुळे अशा धोकादायक ठिकाणी किंवा तशा घटना ठरण्याची शक्यता असणार्‍या ठिकाणी प्रवास करणं भारतीय नागरिकांनी टाळावं. तिथल्या भारतीयांच्या सुरक्षेची हमी निश्‍चित करण्यासाठी आपले उच्चायुक्त कॅनडा सरकारच्या संपर्कात कायम राहतील. कॅनडातील परिस्थिती पाहाता विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांनी अतिशय काळजी घेण्याची व कायम सतर्क राहण्याची गरज आहे, असं या सूचनापत्रात नमूद करण्यात आलं आहे.

गँगस्टर सुक्खाची कॅनडात हत्या – भारतातून फरार झालेला कुख्यात गँगस्टर सुखदुल सिंह उर्फ सुक्खा दुनुके याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी बुधवारी पीनीपेग शहरात त्याची हत्या केली. हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी अशा अनेक गंभीर गुन्ह्यात तो पंजाब पोलिसांना हवा होता. पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, सुक्खा 2017 मध्ये कनाडाला पळून गेला होता. तिथून तो खंडणीचे रॅकेट चालवत होता. दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांमध्ये एनआयएने मंगळवारी 40 हून अधिक कुख्यात गुंडांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात सुक्खाचाही समावेश होता. सुक्खा हा बांबिहा टोळीशी संबंधित होता. लॉरेन्स बिश्‍नोई आणि गोल्डी ब्रार टोळीशी त्याचे वैर होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

COMMENTS