जालना प्रतिनिधी - उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी सभागृहाला सामोरं जायला हवं होतं. शिवाय भाजपला कसा दगा दिला हे सा
जालना प्रतिनिधी – उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी सभागृहाला सामोरं जायला हवं होतं. शिवाय भाजपला कसा दगा दिला हे सांगण्याबरोबरच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत का चाललो हे सांगायला हवं होतं अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला तर विजय भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच होईल असं दानवें यांनी म्हटलं आहे. आज जालन्यातील बदनापूरमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पहाटेच्या शपथविधी बद्दल मला काहीही माहीत नव्हतं असं सांगत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांच्यामध्ये मी सध्या बोलणं योग्य नाही, असेही दानवे म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयावर दोन्हीही गटाने विश्वास ठेवावा, असंही ते म्हणाले. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार नाही असा विश्वास दानवे यांनी वर्तवला आहे.
COMMENTS