Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेबांचं स्वप्न महायुतीने पूर्ण केले : पंतप्रधान मोदी

छ. संभाजीनगर : संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की, छत्रपती संभाजीनगर नाव देण्याची मागणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. राज्यात अडीच वर

औरंगाबादेत दोन चारचाकी वाहनांचा अपघातात चार जणांचा मृत्यू  
राज्यभर मराठा आंदोलनाची धग कायम
Ajintha : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : ऐतिहासिक गांधी चौकात 73 वर्षानंतर ध्वजारोहण

छ. संभाजीनगर : संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की, छत्रपती संभाजीनगर नाव देण्याची मागणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते, पण काँगे्रसच्या दबावामुळे या लोकांची हिंमत झाली नाही, तर महायुती सरकार सत्तेत येताच शहराने नामांतर छत्रपती संभाजीनगर करून बाळासाहेबांचे स्वप्न साकार केल्याचा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांची सभा शहरातील चिकलठाणा एमआयडीतील ग्रॅहम फर्थ कंपनीच्या मैदानावर पार पडली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार भागवत कराड यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मोदी म्हणाले की, पाकिस्तानाच्या व्यक्तिरीक्त जम्मू-काश्मिरमध्ये पुन्हा कलम 370 कलम लागू करण्याचा विचार कोणी करत असेल तर ते काँग्रेस असल्याचे मोदींनी म्हटले आहे. महाराष्ट्रात मजबूत आणि निर्णायक सरकारची आवश्यकता असल्याचे मोदींनी म्हटले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येत महायुतीच्या उमदेवारांना विजयी करण्याचे आवाहन मोदींनी केले.

मराठवाड्यातील पाणी प्रश्‍न सोडवला
महाविकास आघाडीतील लोकांनी महाराष्ट्राच्या केवळ समस्या वाढवण्याचे काम केले मराठवाड्यात प्रदीर्घ काळापासून पाण्याचे संकट आहे. पण हा प्रश्‍न सोडविण्यासाठी काँग्रेस आणि आघाडीवाल्यांनी काहीच केले नाही. पण आमच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच दुष्काळ निवारणीसाठी ठोस पावले उचलण्यासाठी प्रयत्न सुरु केले, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जनता अनेक दशकांपासून करत होती. मराठी गौरवाशी संबंधित हे कामही भाजपने पूर्ण केले आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या या महान यज्ञासोबतच वारसा जपण्याचे संस्कारही आपले सरकार करत आहे. विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी आम्ही पालखी महामार्ग तयार केला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

COMMENTS