अमरावती :भाजप नेते अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी बोलत राहावं, त्याचा फायदा आम्हाला होत
अमरावती :भाजप नेते अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी बोलत राहावं, त्याचा फायदा आम्हाला होत आहे. ते अप्रत्यक्षरित्या आमचंच काम करत असल्याचे बोंडे यांनी म्हटले आहे. त्यांनी जर राष्ट्रवादीकडून ठरवून घेतलं असेल तर ते कदाचीत अंतिम उद्दिष्ट साध्य करतील. त्यामुळे राऊत यांनी हवं तेवढं बोलत रहावं अशी टीका बोंडे यांनी केली आहे. दरम्यान यावेळी अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरेंकडून भाजपावर सुरू असलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने शिवसेना फोडली, पैशांचा वापर झाला अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे. या टीकेला अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले लाहे. जेव्हा कार्यकर्ते आणि पक्षप्रमुखांमध्ये दुरावा निर्माण होतो तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, असं बोंडे यांनी म्हटले आहे.
बोंडे यांनी उद्धव ठाकरेंकडून भाजपावर सुरू असलेल्या आरोपांना उत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी भाजपाने पैशाचा वापर करून शिवसेना फोडली असा आरोप केला. मात्र ठाकरे यांच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील हे सर्व कशाप्रकारे घडले ते सांगितले. पक्षप्रमुख हा कार्यकर्ते आणि पक्षामधील दुवा असतो. मात्र जेव्हा कार्यकर्ते दुरावले जातात तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. अनेक मतदारसंघात शिवसेनेच्या नेत्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीची कुरघोडी सुरू होती. नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं म्हणन ऐकूण घेण्यात आले नाही. परिणामी कार्यकर्ते पक्षापासून दुरावले असं बोंडे यांनी म्हटलं आहे..
COMMENTS