Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेर कारखाना विक्री घोटाळ्यातील आरोपींचा जामीन रद्द

सत्र न्यायालयाचा निकाल, आरोपींच्या अटकेचे आदेश पारनेर : तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील दहा आरोपींना दिलेला अटकपूर्वक जामीन अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांनी रद्द केला आहे. आरोपींमध्ये तलाठी किरण फातले, क्रांती शुगर या खाजगी कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले, संचालक पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले,जालिंदर नवले, गुलाब नवले,शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले यांचा समावेश आहे.  पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर वर्षभरापूर्वी राज्य सहकारी बँक आणि क्रांती शुगर कंपनीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. पुढे सत्र न्यायालयाने आरोपींचा रिव्हीजन अर्ज फेटाळला, त्यानंतर आरोपींनी सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज अटी-शर्ती नुसार मंजुर केला होता.  मात्र न्यायालयाने घातलेल्या अटी – शर्तीचा भंग केल्याचा प्रकार लक्षात येताच, याप्रकरणी फिर्यादी असलेल्या पारनेर कारखाना बचाव समितीने आरोपींचा अटकपूर्व जामीन रद्द करणे कामी सत्र न्यायालयात  अर्ज दाखल केला होता. आरोपींनी अटकपूर्वक जामीनाच्या नावाखाली गैरफायदा घेऊन फिर्यादीवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तसेच तपासात पोलिसांना  सहकार्य करत नसल्याचे पुरावे फिर्यादीकडून न्यायालया समोर ठेवण्यात आले. सत्र न्यायालयाने या गंभीर प्रकाराची  दखल घेऊन आरोपींना मंजुर  केलेल्या अटकपूर्व  जामीनाचे संरक्षण काढून घेतले. आरोपींना तातडीने अटक करून पुढील तपासाचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत.   तपास यंत्रणेवर दबाव ! गुन्हा दाखल होवून वर्षे लोटले आहे. गुन्ह्यात ४२ साक्षीदार आहेत. त्यांची यादी फिर्यादीने तपासी अधिकारी यांना देऊनही आरोपींच्या राजकीय दबावापोटी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच
अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा आनंदराव अडसूळ यांनी पदभार स्वीकारला
छत्रपती शाहूंची व्यापकता !

सत्र न्यायालयाचा निकाल, आरोपींच्या अटकेचे आदेश

पारनेर : तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील दहा आरोपींना दिलेला अटकपूर्वक जामीन अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांनी रद्द केला आहे. आरोपींमध्ये तलाठी किरण फातले, क्रांती शुगर या खाजगी कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले, संचालक पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले,जालिंदर नवले, गुलाब नवले,शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले यांचा समावेश आहे.

 पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर वर्षभरापूर्वी राज्य सहकारी बँक आणि क्रांती शुगर कंपनीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. पुढे सत्र न्यायालयाने आरोपींचा रिव्हीजन अर्ज फेटाळला, त्यानंतर आरोपींनी सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज अटी-शर्ती नुसार मंजुर केला होता.  मात्र न्यायालयाने घातलेल्या अटी – शर्तीचा भंग केल्याचा प्रकार लक्षात येताच, याप्रकरणी फिर्यादी असलेल्या पारनेर कारखाना बचाव समितीने आरोपींचा अटकपूर्व जामीन रद्द करणे कामी सत्र न्यायालयात  अर्ज दाखल केला होता. आरोपींनी अटकपूर्वक जामीनाच्या नावाखाली गैरफायदा घेऊन फिर्यादीवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तसेच तपासात पोलिसांना  सहकार्य करत नसल्याचे पुरावे फिर्यादीकडून न्यायालया समोर ठेवण्यात आले. सत्र न्यायालयाने या गंभीर प्रकाराची  दखल घेऊन आरोपींना मंजुर  केलेल्या अटकपूर्व  जामीनाचे संरक्षण काढून घेतले. आरोपींना तातडीने अटक करून पुढील तपासाचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत.  

तपास यंत्रणेवर दबाव !

गुन्हा दाखल होवून वर्षे लोटले आहे. गुन्ह्यात ४२ साक्षीदार आहेत. त्यांची यादी फिर्यादीने तपासी अधिकारी यांना देऊनही आरोपींच्या राजकीय दबावापोटी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.

COMMENTS