Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे आणि राऊतांना जामीन मंजूर

खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरण

मुंबई ः शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माझगाव कोर्टाने जामीन मंजूर केला

मिझोरममध्य 14 प्रवासी असलेले विमान कोसळले
गुदमरुन तब्बल 46 प्रवाशांचा मृत्यू की मोठा घातपात? | LokNews24
माझी चूक झाली, मला फाशी द्यायची तर द्या ः जितेंद्र आव्हाड

मुंबई ः शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माझगाव कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कोर्टात उपस्थित होते. माझगाव कोर्टाने हा जामीन मंजूर केला. 14 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरे यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर होते. उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांच्या वकीलांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा कोर्टाने केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आरोप मान्य नसल्याचे म्हटले. सामना वर्तमानपत्रात माझ्याविरोधात बदनामीकारक मजकूर छापून आला, असा आरोप करत राहुल शेवाळे यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसून प्रकरण कोर्टात आहे. माझगाव कोर्टाच्या निर्णयामुळे तुर्तास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिलासा मिळाला सामना मुखपत्रामध्ये माझी बदनामी करण्यात आली, असे म्हणत राहुल शेवाळे यांनी मानहाणीचा दावा ठोकला होता. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी त्यांनी मागणी केली होती. कोर्टात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप मान्य केलेले नाही. तुर्तास माझगाव कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. पुढील सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

COMMENTS