Homeताज्या बातम्यासंपादकीय

मोदी मंत्रिमंडळाचा चेहरा बहुजन !

नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व एक प्रकारचं अजब रसायन आहे. काल त्यांनी आपले जम्बो मंत्रिमंडळ बनवले. त्यामध्ये २७ मंत्री ओबीसी, १० एसी, ५  एसटी आणि

न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय ? 
सरकारला निर्णयाचे स्वातंत्र्य असावेच!
कावळ्यांची उपासमार होऊ नये म्हणून?

नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व एक प्रकारचं अजब रसायन आहे. काल त्यांनी आपले जम्बो मंत्रिमंडळ बनवले. त्यामध्ये २७ मंत्री ओबीसी, १० एसी, ५  एसटी आणि ५ अल्पसंख्यांक. एका अर्थाने बहुजन वादी संघटनांना किंवा विचारांना जे साध्य झालं नाही, ते नरेंद्र मोदी एका कृतीतून साध्य करतात. मंत्रिमंडळाचा चेहरा त्यांनी पूर्ण बहुजन ठेवलेला आहे. अर्थात, यामध्येही त्यांनी वरच्या समाजालाही मोठ्या प्रमाणात वाव दिला आहे. परंतु, तो एकूण मंत्री मंडळाचा जो विस्तार आहे, त्याच्या तुलनेने कमीच आहे. यापूर्वी आपण जी जी मंत्रिमंडळं केंद्रामध्ये पाहिली, त्यामध्ये मोदी पूर्व काळामध्ये मंत्रिमंडळाचा चेहरा हा पूर्णपणे वरच्या जात समूहांच्या हितसंबंधांचा आणि समावेशाचा असायचा.  मोदी काळानंतर यामध्ये निश्चितपणे बदल झाला. मंत्रिमंडळातील एससी, एसटी आणि ओबीसी या समुदायाची संख्या निश्चितपणे वाढत राहीली.  मोदींच्या तिसऱ्या कालखंडात या समुदायांची संख्या मंत्रिमंडळात प्रमुख स्थानी आली. ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’, असं म्हणणारे राहुल गांधी यांना मोदींनी प्रत्यक्ष व्यवहारातून एक प्रकारे उत्तर दिले आहे. व्यवहारातील उत्तर हे नेहमीच प्रभावी राहतं. त्यामुळे मोदींच्या बाबतीत असे म्हणता येईल की, अनेक जण एखाद्या छोट्याशा हातोडीने टिकटिक करत राहतात; परंतु, मोदी जो हातोडा वापरतात, तो सगळ्यांना निरुत्तर करून टाकणारा असतो. कदाचित, येणाऱ्या काळामध्ये मोदी देशावर हावी होण्यासाठी निश्चितपणे जातनिहाय जनगणना करण्याची शक्यता आहे; जर, त्यांनी तो निर्णय घेतला, तर, निश्चितपणे भारताच्या राजकारणात ते पुन्हा हावी होतील,  यात शंका असण्याचे कारण नाही.

मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर बरेच लोक काथ्याकूट करत आहेत की, त्यांचे सरकार अधिक काफ चालणार नाही. त्यांना १५ ऑगस्ट ला लाल किल्ल्यावरून भाषण करता येणार नाही. त्या आधीच हे सरकार जाईल, अशा वल्गना करणाऱ्या लोकांनी निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे की, येत्या काही दिवसांमध्ये ते बहुमताच्या ठरावाला सामोरे जातील. एकदा का त्यांनी बहुमताचा प्रस्ताव जिंकला की, सहा महिन्यापर्यंत त्यांचे विरोधात कोणी बहुमताचा ठराव देखील आणू शकत नाही. सहा महिन्याचा काळ हा मोदींसाठी फार मोठा काळ आहे. या काळामध्ये ते आपलं सरकार बहुमतात आणण्यासाठी अनेक गोष्टी करू शकतात. एकदा का त्यांचे सरकार बहुमतात आले, त्यानंतर मात्र ते बऱ्याच गोष्टी साध्य करण्यासाठी सज्ज होतात. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग राहिला आहे. एकंदरीत मोदी आणि त्यांचे पर्व हे अनेक धक्का तंत्रांना देशासमोर आणत असतं. याही वेळी ते अशा प्रकारची धक्का तंत्र एकामागे एक, देशासमोर निश्चितपणे आणतील. त्यांना तिसरी कारकीर्द मिळणार नाही, असं सांगितलं जात असतानाच त्यांनी तिसरी टर्मही घेतली. आघाडीतून का असेना, पण, त्यांनी ती घेतली. मोदींचे पर्व असे अफलातून असतें. त्यांच्या कृतीला केवळ सिध्दांतातून उत्तरे देता येत नाही. मोदींच्रा तिसऱ्या टर्मने मंत्रीमंडळ गठनातून जो प्रयोग केला, त्यास येणाऱ्या काळात कोणतेही सरकार येवो, पण, मोदी पॅटर्न बदलता येणार नाही. ही मोदींची शक्ती आहे. संघ-भाजप आणि मोदी यांच्यामध्ये जर काही अंतर निर्माण झालेच असेल तर त्याला मोदींचे हे सामाजिक धक्कातंत्र अधिक कारणीभूत आहे. पक्ष आणि नेते यांच्यापेक्षा मोदींची विचार करण्याची पध्दती वेगळीच नव्हे, तर, आश्चर्यकारक आहे. परिणामी, त्यांचा सामना करणे इतरांना कठीण जाते.

COMMENTS