Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलापूर शाळेतीन विश्‍वस्तांवर चाइल्ड पोर्नोग्राफीत सहभागी असल्याचा ठपका

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आल्यानंतर या एन्काउंटरवर अनेक प्रश्‍न उपस्थ

माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
दौड यांच्या भूमिकेनंतर पाथर्डी तालुक्याचे राजकारण तापले
सीमाप्रश्‍नी आज विधिमंडळात ठराव मांडणार

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आल्यानंतर या एन्काउंटरवर अनेक प्रश्‍न उपस्थित होत असतांना या संस्थेतील विश्‍वस्तांवर चाइल्ड पोर्नोग्राफीत सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचा धक्कादायक दावा माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला आहे. तसेच बदलापूरमध्ये अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
तिरोडकर यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यातून या एन्काउंटरसंदर्भात अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे. शिवाय याप्रकरणात काही बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे याप्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात लवकरच या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. यासोबतच केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील आणखी एक मुद्दा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे अक्षय शिंदे याने तुरुंगात असताना आपल्याला माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा पोलिसांकडे बोलून दाखवली होती. आरोपी उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे गेला तर प्रकरण वेगळ्याच वळणार जाईल, या भीतीने त्याचा एन्काऊंटर झाल्याचा गंभीर आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.  

अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे पीआय संजय शिंदे कोण ? – बदलापूर अत्याचार घटनातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटरमध्ये खात्मा झाला. अक्षयने पोलिसांच्या व्हॅनमधून जाताना पोलिसांचे पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पोलिसांची गोळी थेट त्याच्या डोक्यात शिरली अन् क्षणार्धातच त्याचा मृत्यू झाला. पोलिस इन्स्पेक्टर संजय शिंदे यांच्या गोळीने त्याचा अचूक वेध घेतला. पीआय संजय शिंदे यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त राहिल्यामुळे या एन्काउंटरकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. अक्षयने पोलिसांचे रिव्हॉल्व्हर हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात पोलिस इन्स्पेक्टर संजय शिंदे व सहाय्यक पोलिस इन्स्पेक्टर नीलेश मोरे जखमी झाले. पण त्या स्थितीतही संजय शिंदे यांनी आरोपी अक्षय शिंदेवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःचे प्राण संकटात टाकत गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.संजय शिंदे यांची पोलिस कारकिर्द फारच वादग्रस्त आहे. त्यांनी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी विभागात वादग्रस्त आयपीएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. 1983 मध्ये पोलिस दलात दाखल झालेले प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हून अधिक गुन्हेगारांचे एन्काउंटर केले. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणार्‍या अधिकार्‍यांमध्ये संजय शिंदे यांचाही समावेश होता.

संस्थेचे विश्‍वस्त आणि सीसीटीव्ही गायब करणारे अद्याप फरार – पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला जरी अटक केले होते तरी, संस्थेचे वादगस्त विश्‍वस्त आणि शाळेतून सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारी अद्याप फरार असल्याने ठाणे पोलिस आणि एसआयटीच्या कारभारावरही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मात्र, आता याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सुपूर्द केला जाण्याची शक्यता आहे.

एन्काउंटर संस्थाचालकाला वाचवण्यासाठी ः अ‍ॅड. आंबेडकर – अक्षय शिंदे याचे एन्काउंटर हे संस्थाचालकाला वाचवण्यासाठी करण्यात आले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. हे प्रकरण दडपण्यासाठीच एन्काउंटर करण्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

गंभीर खुलासे केल्यानेच संपवले ः राऊत – या प्रकरणात अक्षय शिंदे याने काही खुलासे केले आहेत. ते समोर येऊ नये म्हणूनच आरोपीला संपवले असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. एक शिंदे पोलिसांनी संपवला, एक शिंदे नागरिक संपवतील अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

COMMENTS