कल्याण मध्ये युवकांची वाहतुकीच्या नियमांबद्दल आगळ्या-वेगळ्या पद्धतीने जनजागृती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण मध्ये युवकांची वाहतुकीच्या नियमांबद्दल आगळ्या-वेगळ्या पद्धतीने जनजागृती

कल्याण प्रतिनिधी - वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीने वाहन चालकांची जनजागृती करत असतात. तरीदेखील वाहन चालकांकडून सर्

हिरवाईने कातकरी वस्तीवर फुलवला दीपावलीचा आनंद
मुंबई इंडियन्सच्या संघात लसिथ मलिंगाचे पुनरागमन
महाविकास आघाडीचा जागावाटपांचा खेळ

कल्याण प्रतिनिधी – वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीने वाहन चालकांची जनजागृती करत असतात. तरीदेखील वाहन चालकांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होताना दिसते यासाठीच आता वाहतूक पोलिसांबरोबरच कल्याण मध्ये वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी युवकांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने जनजागृती केली. यात युवकांनी सिग्नलच्या लागल्यावर रस्त्यावर चक्क डान्स करत तसेच हातात पोस्टर घेऊन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी जनजागृती केली तसेच यापुढे देखील वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी जनजागृती करत राहणार असल्याचे सांगितले.

COMMENTS