नाशिक प्रतिनिधी - अध्यात्म हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे, साधना केल्यानंतर आपल्या स्वतःमध्ये बदल होणं हे जर होत असेल तर आपण योग्य मार्गा
नाशिक प्रतिनिधी – अध्यात्म हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे, साधना केल्यानंतर आपल्या स्वतःमध्ये बदल होणं हे जर होत असेल तर आपण योग्य मार्गाने साधना करत आहोत, सनातन संस्थेने गुरुकृपा योगानुसार साधना सांगितली आहे, असे प्रतिपादन महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे यांनी गाजरवाडी येथील श्री मोतीराम तुकाराम शिंदे यांच्या 81 व्या वर्षात पदार्पण अमृत महोत्सव या कार्यक्रमात प्रवचन देताना केले.
प्रवचनात त्यांनी पुढे सांगितले की, कुलदेवीची उपासना व श्री गुरुदेव दत्ताचा नाम जप हे शास्त्रामध्ये सांगितले आहे. साधना या विषयावर प्रवचन देताना सर्वात शेवटी त्यांनी महावितरण कंपनीचे सर्व प्रकारची वीज बीले तसेच कृषी वीज धोरण या योजनेनुसार मार्च 2024 मध्ये शेतीपंपाची वीज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करण्याबाबत व वीज चोरी न करण्याबाबत समस्त भाविकांना आवाहन केले. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून जागेवरच श्री शरद नाईकवाडे 1,80,000, रुपये श्री शरद नाना शिंदे 31 हजार रुपये, श्री दत्तात्रेय सालके 11000, श्री आप्पा व अण्णा मोतीराम शिंदे 11340, श्री विजय अण्णा सानप 5800, श्री सुखदेव शिंदे 5000 यांनी शेतीपंपाची वीज बिल भरले. सदर सर्व ग्राहकांचा श्री माळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
निफाड येथील अभियंता श्री जितेंद्र बोरसे यांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना व कृषी सौर पंप योजना याबाबत समस्त भाविकांना माहिती दिली, सर्वांनी या योजनाबाबत सकारात्मक्त दर्शविली. यावेळी गाजरवाडी येथील यावेळी गाजरवाडी येथील प्रतिष्ठित श्री रामदास वाढवणे, श्री बाजीराव दाते, श्री शरद शिंदे, एड. रामचंद्र गाजरे, नांदूर शाखा कार्यालयाचे शाखा अभियंता श्री पंकज पगारे जनमित्र श्री चौधरी, हिरे, वाघ, कांगणे, चकोर, धुळे,वाळके साळुंके व इतर सर्व 400 भाविक उपस्थित होते.,
मुख्य अभियंता श्री दीपक कुमठेकर साहेब व अधीक्षक अभियंता श्री ज्ञानदेव पडळकर साहेब व कार्यकारी अभियंता श्री केशव काळू माळी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली निफाड उपविभागांमध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे
COMMENTS