Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर यांना पुरस्कार प्रदान 

  अहमदनगर ः- येथील  ख्यातनाम लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री आरती काळे याना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचा भास्कर पुरस्कार गोवा येथे  दीनानाथ मंगेशक

खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव मोठे करा
“या” नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला
महात्मा फुलेंनी वंचित घटकाला न्याय देण्याचे काम केले: प्रतापराव ढाकणे

  अहमदनगर ः– येथील  ख्यातनाम लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री आरती काळे याना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचा भास्कर पुरस्कार गोवा येथे  दीनानाथ मंगेशकर कला अकॅडमी,पणजी येथे  प्रदान करण्यात आला यावेळी  गोव्याचे  माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे ,पद्मश्री विनायक खेडेकर,ना.श्रीपाद नाईक,रमाकांत खलप,माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत,राजतीलक नाईक,पद्मश्री संजय पाटील,नलिनी(दिदी)पोतदार,राजीव लोहार आदी मान्यवर उपस्थित होते 

         भास्कर अवॉर्ड हा मानाचा सन्मानाचा पुरस्कार गेली १९ वर्षे पासून गोवा मध्ये दिला जातो, सांस्कृतिक व व विविध क्षेत्रातील कलावंतांना हा दिला जातो त्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत,गुणवंत निवडले  जातात व त्यांना पुरस्कार दिला जातो, यावेळी अनेक मान्यवरांनी आरती काळे यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली तर संयोजकांनी पुरस्काराबद्दल माहिती दिली 

             आरती काळे,नगरकर  या लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री आहेत त्याचे कथक व भरत नाट्यम हे शास्त्रीय शिक्षण झालेले त्यांनी महाराष्ट्र मंडळ(दुबई) मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम,जपान,इंडोनेशिया,रशिया,आदी ठिकाणी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सादर केलेले आहे ,त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तसेच अनेक  ठिकाणी त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत तसेच चित्रपटात त्यानी काम केले आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी त्याचे सर्वत्र  होत आहे  

COMMENTS