Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुरस्कार म्हणजे ऊर्जारूपी कौतुकाची थाप ः कुलगुरू काळकर

कोपरगाव ः पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक मैलाचा दगड आहे. सामाजिक कार्य करत असतांना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे एक कौत

मूलभूत प्रश्‍न सोडवा अन्यथा आंदोलन ः हर्षदाताई काकडे
कट मारल्याच्या कारणावरून एकाच्या खुनाचा प्रयत्न
महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप

कोपरगाव ः पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक मैलाचा दगड आहे. सामाजिक कार्य करत असतांना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे एक कौतुकाची थाप असल्याचं प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पराग काळकर यांनी केलं. शिर्डीतील हॉटेल तानिया प्रेसिडेंट इन इथं राज्यस्तरीय एक्सलन्स अवार्ड पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी डॉ. सुरेश चंद,डॉ. के श्रीनिवास राव, आशा जाखड, अजय चंदनवाले, देवेंद्रकुमार ढुसिया, नंदलाल भारती, निर्मला गावित, धनश्री विखे, निखिल महानुभाव, राजेंद्र बलकवडे, अरुण सिन्हा, कौशल सिंग, गजानन शिरवेकर, अवनीश कुमार, रविकिरण डाके, डॉ प्रदीप फुंदे , विक्रम वर्मा, दिलीप खैरे, प्रसाद खडांगळे, संजय काळे, रामस्वरूप चावला आदिनी आपापल्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला.प्रारंभी डॉ सुरेश चंद यांच्या कल और आज या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अधिक बोलताना काळकर म्हणाले की, साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या परिसरात श्रद्धा आणि सबुरीच्या आशीर्ववचनाने आपण आप- आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्याचे श्रेय नेहमी परमेश्‍वराला अर्पण करत असतो.मात्र ते कार्य करत असताना आपल्याला पुरस्कार मिळावा किंवा शाबासकी मिळावी म्हणून आपण काम करत नाही. परंतु समाजातील ज्या अडचणी व प्रश्‍न आपण प्रत्येक जण सोडवण्याचा पर्यन्त करत आहोत.आपण निसर्गाकडून एक गोष्ट शिकली पाहिजे. निसर्ग जसा एक दाना पेरल्यावर त्यापासून हजारो दाणे तयार करतो. त्याचप्रमाणे आपण आपले कार्य करत राहिल्यास निसर्गात एक अदृश्य शक्ती आपल्यासाठी काम करत राहते. समाजातही अनेक घटक आपल्यासाठी चांगले कामे करत असतात. त्यामुळेच सर्वांच्या प्रति ऋणी राहणे आपले कर्तव्य आहे. येथे पुरस्कार प्राप्त झालेली प्रत्येक मंडळी ईश्‍वरी देन आहे. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या प्रत्येक प्रश्‍नासाठी कार्य केले आहे असेही शेवटी काळकर म्हणाले. यावेळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वेमने, महानंदाचे माजी चेअरमन राजेंद्रबापू जाधव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, दिलीप दारुणकर, सुनील बोरा, सत्यन मुंदडा, ऍड. जयंत जोशी, चांगदेव कातकडे, दीपक विसपुते, राजेंद्र शिंगी, प्रसाद कातकडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हिरालाल महानुभाव यांनी केले तर आभार डॉ. निखिल महानुभाव यांनी मानले.

COMMENTS