Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अगस्ती विद्यालयाचा पारितोषिक समारंभ उत्साहात

अकोले : येथील श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 60 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. अभिनेत्री अपेक्षा चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सिने दिग्दर्शक रविंद्र निंबाळकर, एम के स्टुडिओचे मालक तथा चित्रपट निर्माते मच्छिन्द्र धुमाळ, बालकलाकार शुभम सावंत, कार्यकारी निर्माता महेश नाईक, अभिनेते विराज लटके व पटकथा लेखक संकेत आवळे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी विशेष लक्षवेधी ठरली. आपल्या प्रास्ताविकेतून विद्यालयाचे प्राचार्य मंगेश खांबेकर यांनी विद्यालयाच्या यशाचा वाढता आलेख समोर ठेवत थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा ह नाईकवाडी तथा बाबा यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाने अत्यंत त्याग, समर्पण,सचोटी आणि जिद्दीने ही संस्था प्रगतीपथावर नेत सर्व क्षेत्रात संस्थेला शिखरावर नेऊन ठेवले असल्याचे म्हटले. यावेळी प्रमुख पाहुणे मराठी सिने अभिनेत्री अपेक्षा चव्हाण यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत त्यांना प्रोत्साहित केले. अध्यक्षीय भाषणात शैलजा पोखरकर यांनी एस एस परीक्षेत नेहेमीच संस्थेचेच पहिले पाच विद्यार्थी तालुक्यात चमकत असतात. हा आतापर्यंतचा इतिहास असून संस्था स्तरावर यासंबंधी एकाच वेळी काटेकोरपणे नियोजन केलेले असते असे स्पष्ट करून बाबांनी उभा केलेला हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरु ठेवण्यासाठी अधिक सजग राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी,पत्रकार विजय पोखरकर, डॉ.निलेश सहाणे, माधवराव तिटमे,सचिन शिंदे, गिरीश नवले, सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब पारदे, लक्ष्मण आव्हाड, दिलीप शेणकर, सुरेश कोकणे, आर टी सोनवणे यांचेसह आजी माजी कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा.डॉ. शेळके यांना ‘अवार्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार 
आढळवाडी येथील हरिनाम सप्ताहाची सांगता
शेतकऱ्यांनी केली होती गांज्याची शेती… पोलिसांनी टाकली धाड…

अकोले : येथील श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 60 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. अभिनेत्री अपेक्षा चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सिने दिग्दर्शक रविंद्र निंबाळकर, एम के स्टुडिओचे मालक तथा चित्रपट निर्माते मच्छिन्द्र धुमाळ, बालकलाकार शुभम सावंत, कार्यकारी निर्माता महेश नाईक, अभिनेते विराज लटके व पटकथा लेखक संकेत आवळे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी विशेष लक्षवेधी ठरली.

आपल्या प्रास्ताविकेतून विद्यालयाचे प्राचार्य मंगेश खांबेकर यांनी विद्यालयाच्या यशाचा वाढता आलेख समोर ठेवत थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा ह नाईकवाडी तथा बाबा यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाने अत्यंत त्याग, समर्पण,सचोटी आणि जिद्दीने ही संस्था प्रगतीपथावर नेत सर्व क्षेत्रात संस्थेला शिखरावर नेऊन ठेवले असल्याचे म्हटले. यावेळी प्रमुख पाहुणे मराठी सिने अभिनेत्री अपेक्षा चव्हाण यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत त्यांना प्रोत्साहित केले. अध्यक्षीय भाषणात शैलजा पोखरकर यांनी एस एस परीक्षेत नेहेमीच संस्थेचेच पहिले पाच विद्यार्थी तालुक्यात चमकत असतात. हा आतापर्यंतचा इतिहास असून संस्था स्तरावर यासंबंधी एकाच वेळी काटेकोरपणे नियोजन केलेले असते असे स्पष्ट करून बाबांनी उभा केलेला हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरु ठेवण्यासाठी अधिक सजग राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी,पत्रकार विजय पोखरकर, डॉ.निलेश सहाणे, माधवराव तिटमे,सचिन शिंदे, गिरीश नवले, सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब पारदे, लक्ष्मण आव्हाड, दिलीप शेणकर, सुरेश कोकणे, आर टी सोनवणे यांचेसह आजी माजी कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS