Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड मध्ये गायरान धारकांच्या एल्गार मोर्चास हजारोच्या संख्येने उपस्थित रहा…भय्यासाहेब साळवे.

बीड प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री तथा सामाजीक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले व रिपाई चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशा वरून

महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही – सी. टी. रवी (Video)
बोठेने मेव्हण्याला हुतात्मा दाखवून घेतला 5 लाखांचा लाभ ; रुणाल जरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
सैन्यासाठी स्फोटके बनविणार्‍या कंपनीवर सायबर हल्ला

बीड प्रतिनिधी – केंद्रीय मंत्री तथा सामाजीक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले व रिपाई चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशा वरून बीड मध्ये 20 जून मंगळवार डॉ. आंबेडकर यांनच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारि कार्यालयावर मोर्चा निघणार असून या मोर्च्यात हजारोच्या संख्येने सामील व्हावे असे आवहन री.पा.ई.युवा नेते भय्यासाहेब साळवे यांनी केले आहे.
कसेल त्याची जमीन राहील याचे घर या प्रमाणे बीड शहरातील अनेक भागात पक्के घरे बांधून समाज बांधव आपल्या कुटूंबासह राहत आहे. तसेच बीड तालुक्यातील गायरान धारक जमिनी कसून आपली उपजीविका भागवत आहे,परंतु पंजाब डक न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारावरून बीड शहरातील नागरिकांना,गायरान धारकाला नोटीस देऊन त्याना घरापासून व शेतीपासून वंचित करण्याचे काम राज्य शासना कडून करण्यात येत आहे.त्याना दिलेल्या नोटीस रद्द करून हा अन्याय कारक निर्णय माघे घेण्यासाठी बीड जिल्हा अधिकारी कार्यालयावर यल्गार मोर्चा धडकणार असून या मोर्चाचे नेतृत्व रिपाईचे जिल्हा अद्यक्ष पप्पू जी कागदे हे करणार आहेत.भुमीहिन गायरान धारक कसत असलेल्या गायरान जमिनी नावे करण्यासाठी मुळ कागदपत्रे व पुराव्यासह प्रस्ताव दाखल करत पाठपुरावा करत आहेत परंतु अलीकडच्या काळात पंजाब न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार त्याचा आधार घेऊन राज्य सरकार भूमिहीन गावरान धारकांना जमिनीपासून व घरापासून बेघर करण्यासाठी नोटिसा देऊन अन्याय करत आहे. गावरान धारकांना देण्यात आलेल्या नोटीसांना तात्काळ स्थगिती देऊन निर्णय मागे घेण्यासाठी रिपाई च्या वतीने बीड जिल्हाधिकारि कार्यालयावर दिनांक 20 जून 2023 मंगळवार रोजी सकाळी 11:00 वा. यल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भय्यासाहेब साळवे,मायाताई मिसळे,अवनीश जोगदंड,विलास जोगदंड,दिपक अरुण,गणेश वाघमारे, अप्पा मिसळे,पप्पू वाघमारे,भय्या मस्के यांनी केले आहे….

COMMENTS