नाशिक प्रतिनिधी - उपनगर पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेट समोर सरजीत झांजोटे उर्फ दिंगिया याने जीवे ठार मारण्याच्या उद

नाशिक प्रतिनिधी – उपनगर पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेट समोर सरजीत झांजोटे उर्फ दिंगिया याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने माय लेकीवर जीवघेणा वार करून घटनास्थळावरून पळ काढला. स्वतःवर देखील चाकूने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडलेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी ही महिला जिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती तर हल्लेखोर देखील जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. या हल्ल्यामध्ये अर्चना बाळासाहेब वाघमारे राहणार शिवाजीनगर, जेलरोड ही महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना नाशिकरोड मधील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या पूर्व पतीची मुलगी श्रुती अमोल सोनवणे हिच्यावर देखील चाकूचे वार करत जखमी केले आहे. तिच्यावर नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर हा देखील या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरावर भादंवि 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
COMMENTS