अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचा प्रयत्न…गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचा प्रयत्न…गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिचा छळ केला व तिच्यावर अत्याचार करून तिला गर्भवती केले. त्यानंतर बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घा

ढोकरीकर परिवाराच्या सामाजिक बांधिलकीतून कर्जतमध्ये अग्निशमन केंद्र : खा. सुप्रियाताई सुळे
कराटे खेळामुळे आत्मविश्‍वास निर्माण होतो ः मुख्याधिकारी लोंढे
Sangamner : कोरोना लसीकरणाबाबत प्रबोधनात्मक जनजागृती | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिचा छळ केला व तिच्यावर अत्याचार करून तिला गर्भवती केले. त्यानंतर बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या या पीडित अल्पवयीन मुलीवर पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे येथे सुरू असलेल्या उपचारादरम्यान या पीडित अल्पवयीन मुलीने राजगड (पुणे) पोलिसांना जबाब दिला. तो जबाब राजगड पोलिसांनी नगरच्या एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीचा पती, सासू व सासर्‍याविरुध्द अत्याचार, छळ, मारहाण, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 20 नोव्हेंबर 2021 ते 26 जून 2022 दरम्यान वेळोवेळी घडली आहे.
नगर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या तरुणाचे फिर्यादी पीडित मुलीसोबत लग्न झाले होते. लग्नासाठी झालेल्या खर्चाची मागणी करीत पती, सासू-सासर्‍याने फिर्यादीचा छळ केला. तिला मारहाण व दमदाटी केली. तसेच फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले व गर्भधारणा झाल्यानंतर हे मूल माझे नाही म्हणून तिला पुन्हा मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून तिला गर्भपाताच्या गोळ्या बळजबरीने खायला देवून तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीचा सासू-सासर्‍याने वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ केल्या असल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेने नगर तालुक्यात खळबळ उड़ाली आहे.

COMMENTS