Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे/प्रतिनिधी ःपुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात राहणार्‍या अमर भारत सोसायटी जवळील एका कुटुंबात पत्नीने पतीला दारू पिण्याकरता पैसे दिले नाही. य

देवळाली प्रवरात पर्यावरण पूरक गणेश विसर्जन
तुमचे आजचे राशीचक्र शनिवार, १९ मार्च २०२२ l पहा LokNews24
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

पुणे/प्रतिनिधी ःपुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात राहणार्‍या अमर भारत सोसायटी जवळील एका कुटुंबात पत्नीने पतीला दारू पिण्याकरता पैसे दिले नाही. याकारणावरून रागवलेल्या पतीने पत्नीला शिवीगाळ करून बेदम मारहाण करत साडीने तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी आरोपी पती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 संतोष शिरसाट (वय-38, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे सासरे माधव नारायण सूर्यवंशी (राहणार हादगाव, जिल्हा नांदेड) यांनी जावई विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. माधव सूर्यवंशी यांचा आरोपी संतोष शिरसाठ हा जावई आहे. शीला शिरसाठ (वय-30) हिला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, पत्नीने दारू पिण्यासाठी त्याला पैसे दिले नाही. या कारणावरून पतीने पत्नीला हाताने आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन साडीने तिचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ओलेकर पुढील तपास करत आहे. बहिणीने भावाला वाहन लायसनबाबत विचारणा केल्याचा रागातून भावाने बहिणीवर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच सदर भांडण सोडवण्यासाठी मध्यसथी करणार्‍या आईवर देखील चाकूने वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी साजिद युसुफ पठाण (वय-29, राहणार-हडपसर, पुणे) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आरोपी भावांविरोधात रुबीना युसुफ पठाण या बहिणीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.

COMMENTS