महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या घरावर हल्ला

Homeताज्या बातम्यादेश

महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या घरावर हल्ला

हल्ल्याच्यावेळी स्वाती मालिवाल आणि त्यांची आई घरात नव्हत्या

नवी दिल्ली प्रतिनिधी-   नवी दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा  स्वाती मालिवाल(Swati Maliwal) यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. आज सकाळी ही घटना

कृष्णा-कोयना नदीची पात्रे पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
पदोन्नतीतील आरक्षणासाठी आरपीआयचा आंदोलन सप्ताह
न्यायालयाचा निर्णय मान्य, विधिमंडळ यावर भूमिका घेईल

नवी दिल्ली प्रतिनिधी-   नवी दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा  स्वाती मालिवाल(Swati Maliwal) यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. आज सकाळी ही घटना घडली. हल्ल्याच्यावेळी स्वाती मालिवाल आणि त्यांची आई घरात नव्हत्या. हल्लेखोराने मालिवाल यांच्या वाहनांची तोडफोड केली आणि घरात घुसण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मिळत आहे. स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिल्लीतील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

COMMENTS